Home /News /maharashtra /

कोल्हापुरात राडा, शिवसैनिक आणि बंडखोर आमदार यड्रावकर समर्थक भिडले, VIDEO

कोल्हापुरात राडा, शिवसैनिक आणि बंडखोर आमदार यड्रावकर समर्थक भिडले, VIDEO

यावेळी शिवसैनिकांनी यड्रावकर यांचा पुतळाही जाळला. तसंच कार्यालयाबाहेर असलेला बोर्डही तोडून टाकला.

यावेळी शिवसैनिकांनी यड्रावकर यांचा पुतळाही जाळला. तसंच कार्यालयाबाहेर असलेला बोर्डही तोडून टाकला.

यावेळी शिवसैनिकांनी यड्रावकर यांचा पुतळाही जाळला. तसंच कार्यालयाबाहेर असलेला बोर्डही तोडून टाकला.

    कोल्हापूर, 27 जून :  शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसैनिक कमालीचे संतापले आहे. कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे आमदार आणि आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर  (Rajendra Patil-Yadravkar) यांच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी जोरदार निदर्शनं केली. यावेळी यड्रावकर समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली. शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत. आज शिवसैनिकांनी राजेंद्र पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चाची हाक दिली. त्यामुळे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने त्यांच्या कार्यालयाबाहेर दाखल जमा झाले होते. क्रांती चौकातून शिवसैनिकानी मोर्चाला सुरुवात झाली.  यड्रावकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यालयावर धडक दिली. यावेळी शिवसैनिकांनी यड्रावकर यांचा पुतळाही जाळला. तसंच कार्यालयाबाहेर असलेला बोर्डही तोडून टाकला. यावेळी यड्रावकर समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार झटापट झाली. यड्रावकर यांनी जेवणावळी घालून कार्यकर्ते आणल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात येत असून त्यांच्या एकेक शिवसैनिक या पाच लोकांना भारी पडेल, असा इशारा यावेळी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिला आहे. तर यड्रावकर समर्थकांनी पेडगावकर यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या