मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Shiv Sena Murlidhar Jadhav : धैर्यशील मानेंना माजी खासदार केल्याशिवाय शांत बसणार नाही, मुरलीधर जाधवांची संतप्त प्रतिक्रिया

Shiv Sena Murlidhar Jadhav : धैर्यशील मानेंना माजी खासदार केल्याशिवाय शांत बसणार नाही, मुरलीधर जाधवांची संतप्त प्रतिक्रिया

गोकूळच्या शासकीय प्रतिनिधी पदावरून काढून टाकल्यानंतर मुरलीधर जाधव यांनी खासदार धैर्यशील माने यांच्यावर टीका केलीय.(Shiv Sena Murlidhar Jadhav)

गोकूळच्या शासकीय प्रतिनिधी पदावरून काढून टाकल्यानंतर मुरलीधर जाधव यांनी खासदार धैर्यशील माने यांच्यावर टीका केलीय.(Shiv Sena Murlidhar Jadhav)

गोकूळच्या शासकीय प्रतिनिधी पदावरून काढून टाकल्यानंतर मुरलीधर जाधव यांनी खासदार धैर्यशील माने यांच्यावर टीका केलीय.(Shiv Sena Murlidhar Jadhav)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

कोल्हापूर, 02 ऑक्टोंबर : गोकूळच्या शासकीय प्रतिनिधी पदावरून काढून टाकल्यानंतर मुरलीधर जाधव यांनी खासदार धैर्यशील माने यांच्यावर टीका केलीय. माने आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घरावर काढलेले मोर्चे जाधव यांच्या अंगाशी आल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे. त्यामुळे जाधव यांनी या दोघांवर आरोप करत शिवसैनिक खासदार माने यांना माजी खासदार करणार असे म्हणत आपला रोष व्यक्त केलाय. तर शिवसैनिक हे पद गोकूळच्या संचालकापेक्षा मोठे असल्याचे म्हणत राज्यसरकारवरही निशाणा साधलाय.

मुरलीधर जाधव माध्यमांशी बोलताना म्हणाले कि, सध्या महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण सुरू आहे त्यातील एका शिवसैनिकाचा बळी गेला आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील खासदार धैर्यशील माने यांनी दुग्धविकास मंत्र्यांकडे माझे पद रद्द व्हावे यासाठी तक्रार केली होती. माझ्याठिकाणी मी योग्य आहे मी आदरनीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या निष्ठावंत कार्यकर्ता आहे.

हे ही वाचा : ठाकरे- शिंदे वादाची ठिणगी गोकुळ दूध संघात, मुरलीधर जाधव यांचे संचालकपद रद्द

दरम्यान आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आम्ही राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घरावर मोर्चा काढला होता. तसेच हातकणंगले तालुक्याचे खासदार धैर्यशील माने यांच्या घरावरही मोर्चा काढला होता. याचा राग मनात धरून त्यांनी हे गलीच्छ राजकारण केले आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी माझी शासन नियुक्ती केली होती परंतु यांनी चुकीच्या पद्धतीने माझी शासन नियुक्ती थाबंवल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले कि, हातकणंगले लोकसभा मतदार संघातील गावागावातील तळागाळातील शिवसैनिक पेटून उठलेला आहे. तो तुम्हाला माजी खासदार केल्याशिवाय शांत बसणार नाही. 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. दरम्यान उद्धव  ठाकरे यांच्या सोबत असलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांना याचा फटका बसत आहे. महाविकास आघाडी काळात विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीला कात्री लावत शिंदे सरकारने शिवसेनेसह दोन्ही धक्का दिला होता. दरम्यान उद्धव टाकरे यांनी कोल्हापूर जिल्हा दूध संघात गोकुळमध्ये शिवसेनेच्या मुरलीधर जाधव यांची नियुक्ती केली होती. ही नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. या संदर्भात गोकुळला आदेश प्राप्त झाल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : खासदार धैर्यशील मानेंनी फेसबुक कमेंट बॉक्स सुरू करताच शिवसैनिक पडले तुटून

दरम्यान महाविकास आघाडी काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुरलीधर जाधव यांना गोकुळचे संचालक होण्यासाठी मदत केली होती. गोकुळमध्ये शासन नियुक्त प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली होती परंतु गोकुळकडून ठराव संमत न केल्याच्या विरोधात जाधव यांनी गोकुळचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली होती. 

दरम्यान मागच्या काही दिवसांपूर्वी मुरलीधर जाधव, युवराज पाटील व विजयसिंह मोरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. जाधव यांच्या नियुक्तीनंत त्यांनी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांना दहिहंडीच्या उद्घाटनाला बोलावले होते. यामुळे जाधव यांची गोकुळमध्ये जवळीक तयार झाली होती. परंतु शिंदे सरकारने त्यांची नियुक्ती रद्द केल्याने नव्या वादाला तोंड फुटल्याचे दिसत आहे.

First published:

Tags: Kolhapur, Shiv Sena (Political Party)