कोल्हापूर, 02 ऑगस्ट : मागच्या काही दिवसांपासून आमदार आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रेच्या निमीत्ताने राज्याचा दौरा करत आहेत. (Aditya Thackeray in Kolhapur) ते आज कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमध्ये दाखल झाले यावेळी त्यांनी बंडखोर आमदार आणि खासदारांचा चांगलाच समाचार घेतला. दरम्यान त्यांनी हा मतदारसंघ बंडखोर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांचा नसून उल्हास पाटील यांचा असल्याचे ठाकरे म्हणाले यामुळे आगामी काळात शिरोळ तालुक्याचे राजकारण बदलणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान या शिवसंवाद यात्रेला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. शिवसैनिकांचा प्रतिसाद पाहून आदित्य ठाकरेही भारावून गेले. ही रॅली नाही, तर खूप मोठे स्वागत आहे. लोक प्रेमाने पुढे येत आहेत. बाल्कनी, खिडकीतून, रस्त्यावर येऊन लोक आशीर्वाद देत आहेत, असे सांगून हा यड्रावकरांचा नव्हे, तर उल्हासदादांचा मतदारसंघ आहे. मागील वेळेस येथे थोडे पुढे मागे झाले, परंतु यावेळेस येथे शिवसेना पुन्हा निवडून येईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
हे ही वाचा : 'संजय राऊत 4 वर्ष तुरुंगातच राहणार, म्हणूनच उद्धव ठाकरे..''; बंडखोर आमदाराचा खळबळजनक दावा
आदित्य ठाकरे यांना कोल्हापुरातून जयसिंगपूरमध्ये पोहोचण्यासाठी दीड तासांचा वेळ लागला. रस्त्यावर नागरिकांकडून त्यांचे उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आले. त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. रस्त्यावरील गावात आदित्य यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी शिवसैनिकांची, नागरिकांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद स्वीकारले. प्रत्येक ठिकाणी गाडीतून उतरून ते नागरिकांचे पुष्पगुच्छ स्वीकारत होते. आदित्य ठाकरे यांच्या गाडीमागून शेकडो शिवसैनिकांच्या दुचाकी चालल्या होत्या. हातात भगवा झेंडा घेऊन शिवसैनिक सहभागी झाले होते.
बंडखोर आमदारांवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, यांची गद्दारी आमच्या कानावर येत होती. मात्र, शपथ घेऊन हे आम्ही गद्दारी करणार नसल्याचं म्हणाले आणि शेवटी त्यांनी जे करायचं तेच केलं. परंतु, राजकारणात चांगल्या लोकांना स्थान असतं हे सिद्ध करायचं आहे म्हणून मी बाहेर पडलो, असंही आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
हे ही वाचा : मंत्रिमंडळाचा विस्तार कुठे अडकला? मुख्यमंत्री शिंदेंचं अजितदादांना प्रत्युत्तर
आमदार आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आता कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचली आहे. त्यांच्या शिवसंवाद यात्रेला याठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाला आहे. याठिकाणी बोलताना त्यांनी बंडखोरांवर टीका केली
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aaditya thackeray, Kolhapur, Shiv Sena (Political Party)