मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /...म्हणून शाहू-फुले-आंबेडकरांची नावं घेतो, पवारांनी उदाहरणासह टोचले राज ठाकरेंचे कान

...म्हणून शाहू-फुले-आंबेडकरांची नावं घेतो, पवारांनी उदाहरणासह टोचले राज ठाकरेंचे कान

'फुले शाहू आंबेडकरांचे नाव का घेतात. यासाठी महाराष्ट्राचा अभ्यास केला पाहिजे. महाराष्ट्र वाचला पाहिजे'

'फुले शाहू आंबेडकरांचे नाव का घेतात. यासाठी महाराष्ट्राचा अभ्यास केला पाहिजे. महाराष्ट्र वाचला पाहिजे'

शिवरायांनी जे राज्य केलं ते भोसलेंचं राज्य नव्हतं तर ते रयतेचं राज्य होतं. ते हिंदवी स्वराज होते, ज्यांनी इतिहास घडवला त्यांचे स्थान अंतकरणात आहे, त्याचे नाव सांगायची गरज नाही'

  मुंबई, 23 एप्रिल : 'माझ्यावर टीका केली की, मी शिवाजी महाराज यांचं नाव का घेत नाही. शाहु, फुले आणि आंबेडकर यांचं नाव का घेत आहे. शिवरायांचं नाव हे तुमच्या माझ्या अंतकरणात आहे. लोकांना आजही विचारलं गेलं तर त्यांचं उत्तर फक्त शिवाजी महाराज असं येतं. शिवरायांनी जे राज्य केलं ते भोसलेंचं राज्य नव्हतं तर ते रयतेचं राज्य होतं. ते हिंदवी स्वराज होते, ज्यांनी इतिहास घडवला त्यांचे स्थान अंतकरणात आहे, त्याचे नाव सांगायची गरज नाही' असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.

  राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रेचा कोल्हापूरमध्ये समारोप झाला. यावेळी शऱद पवार यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

  माझ्यावर टीका केली की, मी शिवाजी महाराज यांचं नाव का घेत नाही. शाहु, फुले आणि आंबेडकर यांचं नाव का घेत आहे. शिवरायांचं नाव हे तुमच्या माझ्या अंतकरणात आहे. ते आगळे वेगळे राजे होऊन गेले. कुठे मोगलाचे राज्य होते, कुतुबशाहीचे राज्य होते, अशा परिस्थितीत अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन राज्य स्थापन केले ते शिवाजी महाराजांनी केलं. अनेक राजे होऊन गेले पण तिनशे आणि चारशे वर्षांनंतरही लोकांच्या मनात त्यांचं स्थान आहे, लोकांना आजही विचारलं गेलं तर त्यांचं उत्तर फक्त शिवाजी महाराज असं येतं. शिवरायांनी जे राज्य केलं ते भोसलेंचं राज्य नव्हतं तर ते रयतेचं राज्य होतं. ते हिंदवी स्वराज होते, ज्यांनी इतिहास घडवलं त्यांचे स्थान अंतकरणार आहे, त्याचे नाव सांगायची गरज नाही, असं म्हणत पवारांनी राज ठाकरेंना टोला लगावला.

  'महात्मा ज्योतिबा फुले, शाहु महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांची नावं नाही घ्यायची, शिवछत्रपतीचा इतिहास हा लोकांपुढे ज्योतिबा फुले यांनी आणलं. शाहु महाराज हा आगळा वेगळा राजा होता. सामन्य मानसाच्या हिंता विचार केला, खोटा प्रचार कधी केला नाही. शाहू महाराज अनेकदा त्यांच्या शेतावर जायचे, तिथे गेल्यावर कोल्हापुरातील सरदार लोक भेटायला गेले. कर्नाटकमधून एक मोठा विचारवंत येतो, तो उद्याचं काय आहे ते सांगतो. पण,महाराजांनी सामन्य लोकांच्या कर्तृत्वावर विश्वास असल्याचे सांगितले. ज्याला उद्याचं माहिती आहे, असं सांगत असेल तर ढोंगी असतात असं महाराजांनी सांगितलं. त्यांनी कधी अशा ढोंगी बुवाबाजीवर विश्वास ठेवला नाही' असंही पवारांनी सांगितलं.

  'डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आपण घटनेचे शिल्पकार सांगतो. देशात स्वातंत्र्याच्या आधी एक सरकार होते, त्यावेळी बाबासाहेब हे वीज आणि जलंसधारण खात्याचे मंत्री होते. त्यांच्या त्या काळात त्यांनी अनेक निर्णय घेतले. देशातील अनेक धरणाचे निर्णय त्यांनी घेतले. हा देश पुढे न्यायचा असेल वीज गावात पोहोचली पाहिजे. ज्या गावात वीज तयार होत नाही तिथे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन हे बाबासाहेबांनी उभं केलं होतं. देशाची उन्नती करण्याचे निर्णय बाबासाहेबांनी अनेक वेळा घेतले. राज्य घटना तर त्यांनी लिहिली पण देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी अनेक निर्णय घेतली. म्हणून महात्मा फुले, शाहू आणि आंबेडकर यांचे नाव घेण्याचा अभिमान सर्वसामान्य लोकांना असलाच पाहिजे. जी लोकं असा प्रश्न विचारत आहे, अशा लोकांना महाराष्ट्र समजणार नाही, असंही शरद पवार यांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं.

  First published:
  top videos