Home /News /maharashtra /

Sambhajiraje Chtrapati : शाहू जयंती निमीत्त विधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी संभाजीराजेंकडून लाखोंची शिष्यवृत्ती

Sambhajiraje Chtrapati : शाहू जयंती निमीत्त विधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी संभाजीराजेंकडून लाखोंची शिष्यवृत्ती

शाहू महाराजांचे वारसरदार माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (former mp sambhajiraje chtrapati) यांनी विधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

  कोल्हापूर, 26 जून : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज 148 वी जयंती साजरी केली जात आहे. (148th birth anniversary of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) शाहू महाराजांनी जनतेच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले यामुळे वंचित राहिलेला समाजाची प्रगती झाली. शाहू महाराजांनी घेतलेल्या निर्णयापैकी एक निर्णय विधवा महिलांच्यासाठी (Widowed women) खूप महत्वाचा ठरला विधवा महिलांना समाजात स्थान मिळण्यासाठी महाराजांनी पुवर्विवाह करण्यास कायद्यास संमती दिली. दरम्यान याच पाश्वभुमीवर शाहू महाराजांचे वारसरदार माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (former mp sambhajiraje chtrapati) यांनी विधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

  लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या कारकिर्दीत क्रांतिकारी निर्णय घेऊन विधवा पुनर्विवाहास संमती देणारा कायदा केला होता. हा विचार पुढे नेण्यासाठी विधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था व्हावी, यासाठी माजी खासदार संभाजीराजे यांनी 10 लाखांचा निधी कानपूर विद्यापीठाकरिता जाहीर केला.

  हे ही वाचा : 'आना ही पडेंगा चौपाटी में...' संजय राऊतांचा आठवले स्टाईल शिंदे गटाला खोचक टोला

  उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे असलेल्या छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठामध्ये राजर्षी शाहू जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम माजी खासदार संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी झाला. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनीही 'व्ही. सी. च्या माध्यमातून कार्यक्रमास उपस्थिती लावली. वंचित व शोषित घटकांना न्याय देण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या कार्याची महती सांगणारे नाट्य यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले.

  यानंतर राजर्षीच्या जीवनचरित्रावर आधारित व्याख्यान झाले. संभाजीराजे म्हणाले, 1919 साली कानपूर येथील कुर्मी समाजाने छत्रपती शाहू महाराजांना 'राजर्षी' ही पदवी दिली होती. त्याच शहरातील महाराजांच्या नावे असलेल्या विद्यापीठात त्यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित राहणे माझ्यासाठी गौरवास्पद आहे. विद्यापीठाला निधी दिल्याबद्दल कुलगुरू विनय पाठक यांनी संभाजीराजे यांचे आभार मानले.

  हे ही वाचा : ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या घरी छापा; पिशव्यांमध्ये भरलेले करोडो रूपये, मोजण्यासाठी आणावी लागली मशीन

  शाहू महाराजांच्या आयुष्यावर चित्रपट येणार

  थोर महापुरुषांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगातून अनमोल विचार समाजाला मिळतात. महापुरुषांचे आचार आणि विचार भावी पिढीसाठी मार्गदर्शक असल्याने या विचारांचा प्रचार आणि प्रसार होणे तितकेच महत्वाचे आहे. शाहू महाराजांचे विचार अनेक इतिहास संशोधकांनी त्यांच्या ग्रंथातून मांडले आहेत. आता हे विचार ‘शाहू छत्रपती’ या चित्रटपटाच्या माध्यमातून जगभर पोहचतील, अशे मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले.

  ‘शाहू छत्रपती’ हा चित्रपटातून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य आणि विचार सर्वांसमोर येईल, यासाठी हा चित्रपट भव्य-दिव्य व्हावा, अशी अपेक्षा श्रीमंत शाहू महाराज यांनी व्यक्त करुन चित्रपटास शुभेच्छा दिल्या.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Kolhapur, Sambhajiraje chhatrapati

  पुढील बातम्या