Home /News /maharashtra /

'महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी भाजपने संभाजी छत्रपतींचा गैरवापर केला', संजय राऊतांचा प्रहार

'महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी भाजपने संभाजी छत्रपतींचा गैरवापर केला', संजय राऊतांचा प्रहार

"शिवसेनेला बदनाम करण्याचा जो प्रयत्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि कंपनीने केला होता आज याच कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचा मुखवटा फाडला", असं संजय राऊत म्हणाले.

    कोल्हापूर, 28 मे : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी काल राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या उमेदवारीवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा उल्लेख करत नाराजी व्यक्त केली होती. राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवल्याची टीका संभाजीराजेंनी केली होती. त्यांच्या या टीकेवर त्यांचे वडील शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी आज प्रतिक्रिया दिली. संभाजी महाराजांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेले भाष्य योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं. शाहू महाराजांच्या या भूमिकेवरुन शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर टीका केली. "भाजपने महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी, समाजा-समाजात द्वेषाची भावना निर्माण करण्यासाठी संभाजी छत्रपतींचा गैरवापर केला", असा घणाघात संजय राऊतांनी केला. संजय राऊत नेमकं काय म्हणाले? "शिवसेना कशी आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कसे होते, उद्धव ठाकरे कसे आहेत? वेळ आली तेव्हा एका सामान्य शिवसैनिकाला अलगद विचारणार आणि दिल्लीच्या पार्लिमेंटमध्ये नेवून ठेवणार. जागा कुठलीही असेल. मग ती पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी आणि सध्या गाजत असलेली सहावी जागा असेल. अलगद उचलणार, कुणाला कळलंही नाही. दिल्लीत नेवून सोडणार. आता सहाव्या जागेचा वाद सुरु झालाय. कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचं आभार व्यक्त करु इच्छितो, अभिनंदन करतो. त्यांनी हा संभ्रम दूर केला. शिवसेनेला बदनाम करण्याचा जो प्रयत्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि कंपनीने केला होता आज याच कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचा मुखवटा फाडला. कोल्हापूरच्या भूमीमध्ये अजूनही सत्य आणि प्रामाणिकपणा आहे. छत्रपती घराण्यानं अध्यापही सचोटी धरुन ठेवलेली आहे, हे आज छत्रपतींनी दाखवून दिलं आहे", असं संजय राऊत म्हणाले. "शाहू महाराजांनी जाहीरपणे सांगितलं की पाहा सहाव्या जागेचा संभाजीराजेंविषयीचा जो वाद सुरु आहे तो निरर्थक आहे. शिवसेनेने छत्रपती घराण्याचा अजिबात अपमान केलेला नाही. शिवसेनेने कायम छत्रपती घराण्याचा मान राखलेला आहे. शाहू महाराज म्हणाले की, मी आजही मनाने शिवसैनिक आहे. छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं हे विधान अंबाबाईंनी दिलेला आशीर्वाद आहे. आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. भाजपल्यांनो शाने व्हा आणि हे कपटी कारस्थाने बंद करा", असंदेखील ते म्हणाले. "कालपर्यंत फडणवीस म्हणत होते की, शिवसेनेने संभाजीराजेंची कोंडी केली. पण आता कोंडी तुमची झाली आहे. शिवसेनेची जागा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसेना आहे. आम्ही त्यांना सांगितलं होतं की आपण सन्मानाने या आणि शिवसेनेचे उमेदवार व्हा. पण भाजपने कारस्थान रचलं. महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी समाजा-समाजात द्वेष भावना निर्माण करण्यासाठी संभाजी छत्रपतींचा गैरवापर केला. पण आज प्रत्यक्ष शाहू महाराजांनी भाजपचा मुखवटा फाडला", असा घणाघात संजय राऊतांनी केला.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या