सांगली, 25 जुलै: सांगली (Sangli) जिल्ह्यात आणि पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि धरणांमधून करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा (Krishna River Sangli) आणि वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी 54 फुटांच्यावर गेली आहे. कृष्णा नदीवरील पलूस तालुक्यातील नागठाणे बंधाराही पाण्याखाली गेला आहे. यामुळे वाळवा, नागठाणे, शिरगाव, नागराळे या गावांचा संपर्क तुटला आहे. सांगलीच्या अनेक भागात पाणी शिरले आहे. हळूहळू पाण्याची पातळी वाढत आहे. जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे.
तर जिल्ह्यातील 1 लाखांहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. 30 ते 30 हजार जनावरे स्थलांतर करण्यात आली आहेत. काल पावसाने उघडीप दिली होती. मात्र सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सांगलीला धोका निर्माण झाला आहे. वारणा नदीवरील काही बंधारे, पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वारणा नदीवरील मांगले-कांदे पूल, ऐतवडे खुर्द-निलेवाडी पूल, कणेगाव ते भरतवाडी रस्ता पाण्याखाली गेला आहे. या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
राज्यात मृत्यूचं तांडव; पावसानं घेतले 112 जणांचे बळी, 99 हून अधिक बेपत्ता
चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, तर अन्य तालुक्यांमध्ये संततधार सुरु आहे. धरण पाणलोट क्षेत्रासह शिराळा तालुक्यातील मुसळधार पाऊस सुरु असून धरणातून विसर्गही सुरु आहे.
पालकमंत्र्यांच्या सूचना
पाणी ओसरताच शेती, घरे आदी सर्वच बाबींच्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करण्याच्या सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या आहेत. तसंच पाणी ओसरताच आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक औषध फवारणी करा, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Rain, Sangli, महाराष्ट्र