कोल्हापूर, 22 मार्च : आज गुढीपाडवा आहे. हिंदू धर्मातील वर्षाचा पहिला दिवस आहे. राज्यभरात मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा होत आहे. गुढी उभारून नववर्षाचं मोठ्या धुमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक संकल्प केले जातात. असाच एक संकल्प संभाजीराजे छत्रपती यांनी देखील केला आहे. स्वराज्य संघटना 2024 मध्ये राजकारणाची विजयी गुढी उभा करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
नेमकं काय म्हटलं संभाजीराजे छत्रपती यांनी?
स्वराज्य संघटना 2024 मध्ये राजकारणाची विजयी गुढी उभा करेल असा विश्वास संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला आहे. या सोबतच धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात जाऊन ज्या पद्धतीने पोलखोल केली त्याच पद्धतीने इतर मतदारसंघांमध्ये सुद्धा लवकरच पोलखल करणार असल्याचा इशाराही यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.