मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोल्हापुरकारांसाठी Good News 'या' गावासाठी नियमित विमानसेवा सुरू, पाहा वेळापत्रक

कोल्हापुरकारांसाठी Good News 'या' गावासाठी नियमित विमानसेवा सुरू, पाहा वेळापत्रक

कोल्हापूर-बंगळूर ही विमानसेवा नियमित सुरू झाली आहे. त्यामुळे व्यवसायिकांना, पर्यटकांना आणि सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

कोल्हापूर-बंगळूर ही विमानसेवा नियमित सुरू झाली आहे. त्यामुळे व्यवसायिकांना, पर्यटकांना आणि सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

कोल्हापूर-बंगळूर ही विमानसेवा नियमित सुरू झाली आहे. त्यामुळे व्यवसायिकांना, पर्यटकांना आणि सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 16 जानेवारी : सध्या कोल्हापूरला भारतातील अनेक ठिकाणांशी जोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच कोल्हापूर विमानतळावरुन देशातील इतर महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या कानेक्टिंग फ्लाईट्स सुरू करण्यात येत आहेत. याच दरम्यान 13 जानेवारी पासून कोल्हापूर ते बंगळूर आणि पुढे कोईमतूर अशी नियमित विमानसेवा सुरू झाली आहे.

कोरोनामुळे बंद झालेली कोल्हापूर-बंगळूर विमानसेवा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत पुन्हा सुरु झाली. इंडिगो एअरलाईन्सकडून कोल्हापूर विमानतळावरून देशातील प्रमुख शहरांना जोडणारी ही विमानसेवा सुरू झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर विमानतळावरून इतर शहरांमध्ये ये-जा करणार्‍या व्यवसायिकांना, पर्यटकांना आणि सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच उद्योग क्षेत्रांना एक नवी उभारी मिळणार आहे.

कशी असेल कोल्हापूर-बेंगळूर विमानसेवा?

कोल्हापूर-बंगळूर ही विमानसेवा 13 जानेवारीपासून बंगळूर मार्गे कोईमतूर अशी नियमित सुरु झाली आहे. इंडिगो एअरलाइन्स या कंपनीची ही विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस सुरु राहणार आहे. ही कोईमतूर पर्यंत कनेक्टिंग विमानसेवा असल्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होत आहे. कारण सर्व प्रवाशांना कोल्हापूर विमानतळावरूनच अंतिम ठिकाणापर्यंतचा बोर्डींग पास मिळेल. पण बंगळूर आणि कोईमतूर येथे त्यांना विमान बदलावे लागेल. मात्र, प्रवाशांचे सामान परस्पर दुसर्‍या विमानात चढवले जाईल आणि ते अंतिम स्थानावरच प्रवाशांना मिळेल.

पुढे कोणकोणत्या शहरांना जोडले जाईल कोल्हापूर?

सध्या कोल्हापूर-मुंबई, कोल्हापूर-अहमदाबाद, कोल्हापूर-हैदराबाद आणि कोल्हापूर-तिरूपती बरोबरच आता कोल्हापूर-बंगळूर नियमित विमानसेवा सुरू आहे. तर पुढे भविष्यात इंडिगो एअरलाईन्सच्या चेन्नई, दिल्ली, जयपूर, कोची, कोलकत्ता, लखनऊ, तिरूअंनतपुरम, त्रिचीरापल्ली आणि विशाखापट्टणम अशा अनेक शहरांसाठी कनेक्टींग विमानसेवांचा लाभ प्रवाशांना मिळणार आहे.

Dog Show : कोल्हापुरात डॉग शो ला जोरदार प्रतिसाद, देशभरातील श्वानांनी आणली बहार, Video

कोल्हापूर विमानतळावर ये-जा करणाऱ्या विमानांचे वेळापत्रक

1) कोल्हापूर-बंगळूर - सोमवार ते रविवार रोज दुपारी 04: 45 वाजता आगमन, 05:05 वाजता निर्गमन

2) कोल्हापूर-अहमदाबाद - सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार दुपारी 12:40 वाजता आगमन, 01:00 वाजता निर्गमन

3) कोल्हापूर-तिरूपती - मंगळवार, गुरुवार, शनिवार दुपारी 01:00 वाजता आगमन, 01:20 वाजता निर्गमन

4) कोल्हापूर-तिरूपती - सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार दुपारी 02:05 वाजता आगमन, 02:25 वाजता निर्गमन

5) कोल्हापूर-हैदराबाद - सोमवार ते रविवार रोज दुपारी 03:35 वाजता आगमन, 03:55 वाजता निर्गमन

6) कोल्हापूर-मुंबई - मंगळवार, गुरुवार, शनिवार सकाळी 11:30 वाजता आगमन, 11:55 वाजता निर्गमन

First published:

Tags: Kolhapur, Local18