मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोल्हापुरात खाजगी सावकारानं अल्पवयीन मुलीला दिल्या नरक यातना; पीडितेच्या प्रसूतीनंतर खळबळ

कोल्हापुरात खाजगी सावकारानं अल्पवयीन मुलीला दिल्या नरक यातना; पीडितेच्या प्रसूतीनंतर खळबळ

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Rape in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले याठिकाणी एका 61 वर्षीय खाजगी सावकाराने एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार (Rape on minor) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • Published by:  News18 Desk

कोल्हापूर, 09 जानेवारी: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील हातकणंगले याठिकाणी एका 61 वर्षीय खाजगी सावकाराने एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार (Rape on minor) केल्याची घटना उघडकीस आली आहे. नराधम आरोपीनं पीडित मुलीला बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी घेऊन जात तिच्यावर अनेकदा अत्याचार केला आहे. यातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिने बाळाला जन्म (Victim gave birth to baby girl) दिला आहे.

या प्रकरणी सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल (FIR Lodged) केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संजयनगर पोलिसांनी हा गुन्हा हातकणंगले पोलिसांकडे वर्ग केला आहे. पोलिसांनी नराधम आरोपीला अटक (Accused arrested) केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

नंदकुमार चंद्रकांत निगवे (वय-61) असं गुन्हा दाखल झालेल्या नराधम आरोपीचं नाव आहे. तो कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील दर्गा चौक परिसरातील रहिवासी आहे. आरोपी निगवे याने पीडितेच्या इच्छेविरोधात तिला नवीन बांधकामाच्या ठिकाणी घेऊन जात अनेकदा अत्याचार केला आहे. याच अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली होती. त्यामुळे तिच्यावर सांगलीतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते.

हेही वाचा-पॉर्न VIDEO दाखवून विवाहितेवर अनैसर्गिक अत्याचार, पतीसह सासरच्यांवर FIR दाखल

याठिकाणी तिची प्रसूती झाली असून तिने मुलीला जन्म दिला आहे. या प्रकारानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. हा गुन्हा आता हातकणंगले पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी केली जात आहे.

हेही वाचा-नाशकातील जंगलात 10 वर्षीय मुलीसोबत सुरू होता भयंकर प्रकार; ऐनवेळी गुराखी आला अन्

61 वर्षीय नराधम आरोपी हा सराईत गुन्हेगार असून हातकणंगले पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल आहेत. त्याने खाजगी सावकारीतून देखील काही गुन्हे केले आहेत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी त्याची धिंड देखील काढली होती. आरोपी निगवे याला न्यायालयात हजर केल असता, न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

First published:

Tags: Crime news, Kolhapur, Rape on minor