मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लग्न करण्याची तयारी, मात्र केली आत्महत्या; सांगलीतील डोंगरावर एका तरुणासह दोन तरुणींनी जीवन संपवलं!

लग्न करण्याची तयारी, मात्र केली आत्महत्या; सांगलीतील डोंगरावर एका तरुणासह दोन तरुणींनी जीवन संपवलं!

सांगलीतील या डोंगरावर या मृतदेहाशेजारी हार-तुरे आणि इतर काही वस्तू सापडल्या आहेत.

सांगलीतील या डोंगरावर या मृतदेहाशेजारी हार-तुरे आणि इतर काही वस्तू सापडल्या आहेत.

सांगलीतील या डोंगरावर या मृतदेहाशेजारी हार-तुरे आणि इतर काही वस्तू सापडल्या आहेत.

सांगली, 23 डिसेंबर : तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे शेकोबा डोंगरावर एका युवकासह दोन तरुणींनी विषारी औषध प्राशनकरून आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक (Shocking News) घटना गुरुवारी समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून (Love Affair) आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. मात्र एक तरुण आणि दोन तरुणींनी एकाचवेळी आत्महत्या केल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू असून नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत तासगाव पोलिसांत नोंद झाली आहे.

हरिष हणमंत जमदाडे (वय 21), रा. मणेराजुरी, प्रणाली उध्दव पाटील(वय 19) मुळ रा. जायगव्हाण, सध्या रा. मणेराजुरी आणि शिवाणी चंद्रकांत घाडगे(वय 19) रा. हतीद, ता. सांगोला, जि. सोलापूर अशी आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती नुसार मणेराजुरी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर शेकोबा डोंगर आहे. या डोंगरावर गुरुवारी सकाळच्या सुमारास गावातील काही नागरिक जात असतानाच त्यांना तिघेजण मृतावस्थेत आढळून आले. याची माहिती पोलीस पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पवार यांना देण्यात आली. त्यानी घटनास्थळी येत याची माहिती पोलिसांना दिली.

घटनास्थळावर विषारी औषधाची बाटली, तीन ग्लास, लग्नात वापरण्यात येणारे हार, तुरे, चॉकलेट असे साहित्य आढळून आले. बुधवारी रात्रीच्या सुमारास हे तिघे या डोंगरावर आले असल्याचा संशय असून आत्महत्येमागे प्रेमसंबंधांचे कारण असावे, अशी चर्चा आहे. एकाच वेळी तिघांनी आत्महत्या केल्याची घटना समजल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. घटनास्थळावर नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेची माहिती समजताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळावला भेट देत पंचनामा केला आहे.

हे ही वाचा-लैंगिक संबंधानंतर युवकाने केलं ब्लॉक; बदला घेण्यासाठी तरुणीचा भलताच प्रताप

प्रेमाचा त्रिकोण का घातपात ?

आत्महत्या केलेल्या तरुणाचे नात्यातील असणार्‍या प्रणाली या तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू होती. या तरुणीने साडी परिधान केली होती. हार - तुरे असल्यामुळे लग्न करण्याचे नियोजन केले असावे, असे बोलले जात आहे. मात्र डोंगरावर येतानाच विषारी औषधाची बाटली घेवून आल्यामुळे नियोजन करूनच आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. मात्र ही आत्महत्या प्रेमाच्या त्रिकोणातून झाली की आणखी काही कारणामुळे झाली, याचा नेमका उलगडा अद्याप झालेला नाही.

तरुण रेकॉर्डवरचा आरोपी...

आत्महत्या केलेला हरीष जमदाडे याचा गेल्या काही महिन्यांपासून पोलीस शोध घेत होते. तो चोरीच्या प्रकरणांतील संशयित आरोपी असून पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र तत्पुर्वीच हरीषच्या आत्महत्येची घटना घडली.

First published:

Tags: Crime, Sangali, Suicide news