Home /News /maharashtra /

Kolhapur, sangli, Solapur heavy rainfall : कोल्हापूर, सांगली, सोलापुरात पावसाची हजेरी; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

Kolhapur, sangli, Solapur heavy rainfall : कोल्हापूर, सांगली, सोलापुरात पावसाची हजेरी; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे.(Kolhapur, sangli, Solapur heavy rainfall) दरम्यान मान्सून पूर्व पावसाने (Pre-monsoon rains) अचानक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची (farmer) ऐनवेळी मोठी धावपळ झाली.

  कोल्हापूर, 20 मे : राज्यात उन्हाचा पारा वाढत असताना आता अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने (imd alert) दिलेल्या माहितीनुसार मागच्या २४ तासांपासून कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे.(Kolhapur, sangli, Solapur heavy rainfall) दरम्यान मान्सून पूर्व पावसाने (Pre-monsoon rain) अचानक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची (farmer) ऐनवेळी मोठी धावपळ झाली आहे. शेतीची मशागतीची कामे जिथल्या तिथे थांबली तर उन्हाळी सोयाबीन, केळी, द्राक्ष बागायतदारांना याचा मोठा फटका बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरूंदवाड येथे एका शेतकऱ्याने थेट सोयाबीन फेकून दिले तर पंढपूरच्या शेतकऱ्यांचे केळी बागेचे मोठे नुकसान झाले आहे.

  उन्हाळी सोयाबीन कापणीचा हंगाम सुरू असताना, गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने सोयाबीन कापणीत मोठी अडचण निर्माण झाली आहे. सोयाबीनच्या बोगस बियाणांमुळे आधीच शेतकऱ्याची फसवणूक झाली असताना, हे दुहेरी संकट शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. वादळी पावसाने खरिपाचा हंगाम धोक्यात आल्याचे कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पहायला मिळाले.

  हे ही वाचा : कोकणच्या हापूसने अमेरिकेला लावलं वेड; पुण्यातून थेट White House मध्ये आंबा जाणार

  काही दिवसांतच सोयाबीन कापणी होऊन काहीतरी आर्थिक हातभार लागेल या आशाने शेतकऱ्यांच्यात उत्साह संचारला होता. पण अचानक सुरू झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्याच्या चेहऱ्यांवर निराशा दिसत आहे. शिरोळ तालुक्यात सोयाबीनच्या बोगस बियाणांचा सुमारे 400 हेक्टरहुन अधिक शेतीला फटका बसला आहे. पेरा केलेल्या सोयाबीनच्या रोपांची उंची वाढली, शेंगा लागल्या, त्या गळून पडल्या तर काही रोपांना शेंगाच लागल्या नाहीत. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन शेतीवर रोटर फिरवत संताप व्यक्त केला आहे.

  सोयाबीन बियाणांच्या फसवणुकीमुळे एकरी २० ते २२ क्विंटल उतारा पडेल असे सांगितले होते. मात्र एकरी 7 ते 8 क्विंटल उतारा पडण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली होती. अशातच ऐन मळणी दरम्यान पाऊस पडत असल्याने कापणी करून ठेवलेल्या सोयाबीन शेंगात पाणी राहिल्याने शेंगा काळ्या पडून, त्याला कोंब येण्याची भीती असल्याने सोयाबीन कापणी करून ठेवलेला शेतकरी हवालदिल झाला आहे.

  हे ही वाचा : सांगलीत मान्सूनपूर्व पावसाचं थैमान; गुड्डापूर मंदिर परिसरात गुडघाभर पाणी, रस्ते पाण्याखाली, VIDEO

  तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटेमुळे शेती पिकांवर मोठा परिणाम झाला असताना अचानक आलेल्या पावसाने केळी पिकांचे मोठे नुकसा झाले आहे. मागच्या 24 तासांत पंढरपूरसह परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये केळी बागांचे मोठे नुकसान होत आहे. वादळी वाऱ्यामुळे केळीची झाडे उन्मळून पडली आहेत. तर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यात द्राक्षांच्या घडाचेही नुकसान झाले आहे. आतापर्यंत अवकाळीचा धोका होता आणि आता मान्सूनपूर्व पावसाचा फटका बसला आहे.

  गोवा राज्याला लागून असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात सर्वाधिक 68 मिमी पावसाची नोंद झाली, या पाठोपाठ हातकणंगले 48, गडहिंग्लज 35, राधानगरी 19, आजरा 68, शिरोळ 48, शाहूवाडी 9,पन्हाळा 40, गगनबावडा 47, चंदगड 55, करवीर तालुक्यासह अन्य तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचबरोबर सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, या तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात 19, सांगोला 23, तर माढा तालुक्यात 2.4 मिमी पावसाची नोंद झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-8, लांजा-13, चिपळूण-18, देवरुख-8, राजापूर-3, मंडणगड-0, पारनेर-21, राहुरी-1.6 अशी पावसाची नोंद झाली.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Kolhapur, Rain fall, Rain in kolhapur, Sangli (City/Town/Village), Solapur

  पुढील बातम्या