कोल्हापूर, 22 जानेवारी: गरूड मंडप हा करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र याच ऐतिहासिक मंडपाच्या खांबांना वाळवी लागली असल्याचं समोर आलं आहे. खांबाना वाळवी लागल्यानं हे खांब खचून मंडपाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता तातडीने या कामाच्या दुरुस्ती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. खांबाच्या ज्या भागात वाळवी लागली आहे, खांबाचा तो भाग कट करून त्याच्याखाली दगडाचा पाट सरकवण्यात येणार आहे. या कामासाठी सर्व आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आल्याचं मंदिर प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
185 वर्षांपेक्षाही अधिक जुने बांधकाम
गरूड मंडम हा करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा महत्त्वाचा भाग आहे. हा ऐतिहासिक मंडम साधारणत: 1839 मध्ये बांधण्यात आला. यासाठी 48 लाकडी खांबाचा वापर करण्यात आला आहे. गरूड मंडपाचं हे बांधकाम 185 वर्षांपेक्षाही अधिक जुने आहे. या मंडपाच्या बांधकामाला शेकडो वर्ष उलटल्यानं आता यातील काही खांब खराब होऊ लागले आहेत. या खांबाला आतून वाळवी लागल्या मंडपाच्या 48 खांबांपैकी आठ खांब हे पोखरले गेले आहेत. त्यामुळे या मंडपाला धोका निर्माण झाला आहे, ही गोष्ट लक्षात येताच या खांबाच्या दुरुस्तीचे काम पश्मिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून सुरू करण्यात आलं आहे.
8 खांबांना वाळवी
गरूड मंडपाचं बांधकाम हे 185 वर्षांपेक्षाही अधिक जुने आहे. या मंडपाचा डोलारा एकूण 48 खांबावर उभा आहे. मात्र हे बांधकाम 185 वर्षांपेक्षाही अधिक जुने असल्यानं आता यातील खांबांना वाळवी लागण्यास सुरुवात झाली आहे. मंडपाचे आठ खांब वाळवीने पोखरले आहेत. यामुळे मंडपाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पश्मिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून या खांबांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये खराब झालेल्या खांबाचा भाग कट करून त्याला दगडी चौथऱ्याचा आधार देण्यात येणार असल्याची माहिती, देवस्थान समितीकडून देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur