मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

No Shave November : कोल्हापूरच्या तरुणांनी गोळा केली कॅन्सरग्रस्तांसाठी मदत, पाहा Video

No Shave November : कोल्हापूरच्या तरुणांनी गोळा केली कॅन्सरग्रस्तांसाठी मदत, पाहा Video

X
नो

नो शेव्ह नोव्हेंबर या मोहिमे अंतर्गत कॅन्सरग्रस्त रुग्णांना देण्यासाठी तरुणांनी मदत गोळा केली आहे.

नो शेव्ह नोव्हेंबर या मोहिमे अंतर्गत कॅन्सरग्रस्त रुग्णांना देण्यासाठी तरुणांनी मदत गोळा केली आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 01 डिसेंबर : साधारणतः 'नो शेव्ह नोव्हेंबर' म्हणजे फक्त दाढी-मिशा न काढणे अशी व्याख्या सर्वांना माहीत असेल. पण कोल्हापुरात नो शेव्ह नोव्हेंबर ही एक व्यापक मोहीम बनली आहे. दरवर्षी अनेकानेक तरुण या मोहिमेत सहभागी होऊन समाजातील कॅन्सरग्रस्तांना मदत करत असतात. यावर्षी ही नोव्हेंबर महिन्यामध्ये एकत्रित येत तरुणांनी कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी मदत गोळा केली आहे.

कधी पासून राबविण्यात येत आहे मोहीम?

सुरुवातीला शेखर पाटील आणि दर्शन शहा यांच्या डोक्यात हा मोहिमेचा विचार आला होता. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक कॅन्सरचे हजारो रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी या तरुणांनी ही मोहीम राबवायला सुरुवात केली. त्यानुसार सलग 5 वर्षे ही मोहीम अगदी उत्साहाने राबविण्यात येत आहे. दरवर्षी याला प्रतिसाद वाढतच असून अनेक रुग्णांना यामुळे आर्थिक मदत केली जात आहे. आजपर्यंत जवळपास 20 रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आल्याचे मोहीमेतील सदस्य संतोष शिंदे यांनी सांगितले.

Kolhapur : व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तरुण करतायत रुग्णांची मदत, अनेकांचे वाचवले प्राण, Video

या मोहिमेची व्याप्ती आजपर्यंत दरवर्षी वाढतच चालली आहे. या मोहिमेला समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी पाठिंबा दिला आहे. बरेचसे प्रतिष्ठित नागरिक सुद्धा युवकांसोबतच आपल्या परीने दाढीवर होणारा एक महिन्याचा खर्च वाचवून मोहिमेला देत आहेत. हेच या मोहिमेचे यश असल्याचे ग्रुपचे सदस्य निलेश सुतार यांनी म्हटले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही कॅन्सरग्रस्तांना मदत

प्रत्येक वर्षी या मोहीमेला अधिकाधिक प्रतिसाद मिळत चालला आहे. या तरुणांच्या ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी 4 ते 5 कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना जमा झालेली मदत देण्यात येते. आजपर्यंत 20 कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करण्यात आली आहे. तर जवळपास दोन ते अडीच लाखांहून अधिक आर्थिक मदत करण्यात आली आहे. यावर्षी देखील जवळपास 50 ते 60 हजार रुपयांची मदत गोळा झाली आहे. त्यातून आता 5-6 जणांना मदत करण्यात येणार आहे.

Sangli : बेघरांसाठी मायेची 'सावली', शेकडो जणांना मिळाला आधार, पाहा Video

उपक्रम घेऊन कॅन्सरग्रस्तांना विविध योजनांची देणार माहिती

यापुढे या मोहिमेतील तरुण मिळून कॅन्सरग्रस्तांना विविध योजनांची विविध उपक्रम घेऊन माहिती करून देणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या उपचारासाठी देखील मदत करणार आहेत, असे ग्रुपचे शेखर पाटील यांनी सांगितले आहे.

First published:

Tags: Kolhapur, Local18