मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'भाकरी फिरवण्याची सुरुवात कोणापासून करणार?' अजितदादांनी दिलं उत्तर

'भाकरी फिरवण्याची सुरुवात कोणापासून करणार?' अजितदादांनी दिलं उत्तर

विरोधी पक्षनेते अजित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून भाकरी फिरवण्याची चर्चा होत आहे. आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा नेतृत्व बदलाचे संकेत दिले आहे.

कोल्हापूर, 20 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाकरी फिरवण्याचे संकेत दिले होते. नंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला असला तरी नेतृत्वात बदल करणार असल्याचे सांगितले होतं. आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाकरी फिरवण्याचा उल्लेख केला आहे. याची सुरुवात आमच्यापासून करणार असल्याचं म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अजित पवार आज कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

भाकरी फिरवावी लागणार : अजित पवार

भाकरी फिरवावी लागणार आहे. हे मी जरा स्पष्टच सांगतो. भाकरी फिरवण्याची सुरुवात आम्ही आमच्यापासून करणार आहोत. कुठल्याच मतदार संघात कोणाची मक्तेदारी नसते. राधानगरीत ए.वाय आणि के.पीचं मिटत नाही तोपर्यंत आबिटकरच फावणार आहे. राजकारण हवेवर करून चालत नाही. कोणतीच लाट फार काळ टिकून राहत नाही. तुम्ही पक्षाची ताकत वाढवा, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांना जागा कशा वाढवून द्यायच्या ते मी बघतो. त्यात मी वस्ताद आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. तेव्हा आता राज्य ढवळून काढायचं आहे, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

महापुरुषांच्या विचारावर राष्ट्रवादीची वाटचाल सुरु आहे. शरद पवार यांना कोल्हापूर जिल्ह्याने नेहमीच प्रेम दिलं आहे. आपण आत्मपरीक्षण केल पाहिजे. दोन खासदार आणि निम्मे आमदार असलेल्या जिल्ह्यात आता फक्त 2 आमदार आहेत. राष्ट्रवादीला कोल्हापूरचं पालकमंत्रीपद मिळालं नाही, ही कार्यकर्त्यांची खंत आहे.  नेते आल्यानंतर बुके द्यायचा, शाल घालायची याने पक्ष वाढत नाही. त्यासाठी सामान्य लोकांपर्यंत पोहचावं लागतं. साहेबांवर, पक्षावर प्रेम असलं तरी इथून पुढे अंग झटकून काम केलं पाहिजे. वन बूथ ट्वेंटी युथ ही संकल्पना आता आता राबवली पाहिजे. फ्लेक्स लावून, कटाउट लावून पक्ष वाढत नाही. राजकारणात येऊ इच्छित असणाऱ्या युवकांना आता चांगली संधी आहे. युवक राष्ट्रवादीची जबाबदारी 22 ते 28 वर्षाच्या कार्यकर्त्यांना संधी द्या, अशी सूचना अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मला मुख्यमंत्र्यांचा अपमान करायचा नाही. देशाच्या पंतप्रधान मुर्म आहेत सांगतात. कस सरकार चाललंय? 50 हजारांची मदत अजून दिली नाही, कसल्या याद्या करत आहात? शेतकऱ्यांच्या इतक्या समस्या आहेत. सरकार काय करतंय. हे सर्व सामान्यांचे सरकार आहे असं म्हणतात. अरे कशाच सर्वसामान्यांचे सरकार? महिलांना एसटी मोफत करण्यापेक्षा गॅसदर कमी केले असते तर महिलांनी डोक्यावर घेतलं असतं, अशी टीका पवारांनी शिंदे सरकारवर केली.

First published:
top videos

    Tags: Ajit pawar, NCP