मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जे केलं ते योग्यच! गोडसे नसते तर भारताचा नाश झाला असता, कालीचरण महाराज पुन्हा बडबडले

जे केलं ते योग्यच! गोडसे नसते तर भारताचा नाश झाला असता, कालीचरण महाराज पुन्हा बडबडले

'जितकं तुम्ही नथुराम गोडसे यांच्याबद्दल वाचणार तेवढे तुम्ही त्यांचे भक्त व्हाल.

'जितकं तुम्ही नथुराम गोडसे यांच्याबद्दल वाचणार तेवढे तुम्ही त्यांचे भक्त व्हाल.

'जितकं तुम्ही नथुराम गोडसे यांच्याबद्दल वाचणार तेवढे तुम्ही त्यांचे भक्त व्हाल. नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींच्या बाबत केले ते बिल्कुल योग्य केले

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी

कोल्हापूर, 01 एप्रिल : 'जितकं तुम्ही नथुराम गोडसे यांच्याबद्दल वाचणार तेवढे तुम्ही त्यांचे भक्त व्हाल. नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींच्या बाबत केले ते बिल्कुल योग्य केले. नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता, असं वादग्रस्त विधान कालीचरण महाराज यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे.

कालीचरण महाराज हे कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी पुन्हा एकदा नथुराम गोडसे यांची स्तुती करत महात्मा गांधींवर टीका केली.

जितकं तुम्ही नथुराम गोडसे यांच्याबद्दल वाचण कराल तेवढे त्यांचे भक्त व्हाल आणि महात्मा गांधींचे विरोधक व्हाल. नथुराम गोडसे यांनी जे केलं ते योग्यच केलं आहे. महात्मा नथुराम गोडसे यांना कोटी कोटी नमस्कार आहे. ते नसते तर भारताचा नाश झाला असता, असं वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केली.

राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई योग्यच आहे. प्रमाण नसताना कुणाला कुणी चोर म्हणणे हा दंड आहे. ते हिंदू हिताची गोष्ट करत आहे. ते यांचे शत्रू आहे. त्यामुळे ते कायम हिंदूंची निंदा करत असतात.

हिंदू लोक हे राहुल गांधींच्या वोटर बँकचे शत्रू आहेत. हिंदू आता शेळफट राहिला नाही. फालतू सेक्युलिझम हिंदूंनी सोडून दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नपूर्तीसाठी हिंदू एक होत आहे, असंही कालीचरण महाराज म्हणाले.

First published:
top videos