मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Kolhapur: भल्या पहाटे घरातून गायब झाली विवाहित तरुणी अन्..; शेतातील विहिरीत आढळली मृतावस्थेत

Kolhapur: भल्या पहाटे घरातून गायब झाली विवाहित तरुणी अन्..; शेतातील विहिरीत आढळली मृतावस्थेत

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथील कोडोली गावात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका 23 वर्षीय विवाहित तरुणीचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळला (Dead body found in well) आहे.

  • Published by:  News18 Desk

पन्हाळा, 11 जानेवारी: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील पन्हाळा (Panhala) येथील कोडोली गावात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका 23 वर्षीय विवाहित तरुणीने भल्या पहाटे शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या (Married woman commits suicide by jump into well) केली आहे. भल्या पहाटे तरुणी घरातून गायब झाल्याने कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. यावेळी शेतातील विहिरीच्या काठावर विवाहितेच्या चपला आणि स्वेटर आढळला. संशयावरून पाण्यात शोध घेतला असता, तिचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती कोडोली पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सोनम नीलेश गुरव असं आत्महत्या करणाऱ्या 23 वर्षीय विवाहित महिलेचं नाव असून त्या पन्हाळा तालुक्यातील जाखले गावातील रहिवासी होत्या. सोमवारी पहाटे त्यांनी बामणाचे मळ्यातील एका विहिरीत उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे. त्यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची कोणतीही माहिती समोर आली नाही. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून याबाबतची फिर्याद सासरे हंबीरराव शंकर गुरव यांनी दिली आहे.

हेही वाचा-कॉलेजला जाण्याची तयारी केली पण घरातच आढळली मृतावस्थेत, युवतीचा हृदयद्रावक शेवट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सोनम गुरव या सोमवारी पहाटे घरात नसल्याचं कुटुंबीयांच्या निदर्शनास आलं. यामुळे कुटुंबीयातील सदस्यांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली. पण त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. यानंतर शेतातील एका विहिरीजवळ सोनम यांच्या चपला आणि स्वेटर दिसून आला. संशय आल्यानं कुटुंबीयांनी आणि आसपासच्या तरुणांनी पाण्यात शोध घेतला. यावेळी सोनम यांचा मृतदेह पाण्यात आढळून आला आहे.

हेही वाचा-धक्कादायक! एका मेसेजमुळे मुलीने संपवलं आयुष्य; यात असं नेमकं काय लिहिलं होतं?

या घटनेची माहिती कोडोली पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, घटनास्थळाचा पंचनामा केला. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं आहे. मृत सोनम यांच्या मागे पती, दोन मुलं शिवतेज (वय-4) व शिवम (दीड वर्ष) आणि सासू-सासरे असा परिवार आहे.

First published:

Tags: Crime news, Kolhapur, Suicide