Home /News /maharashtra /

'मुश्रीफ इतके गोंडस आहेत की....'; नाना पाटेकर कागलमध्ये थेटच बोलले

'मुश्रीफ इतके गोंडस आहेत की....'; नाना पाटेकर कागलमध्ये थेटच बोलले

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर ( nana patekar ) आज कागलमध्ये होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ( hasan mushriff ) यांनी उभारलेल्या समाजसुधारकांच्या पुतळ्यांचे अनावरण नाना पाटेकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

    कोल्हापूर, 4 जून-  ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (  nana patekar ) आज कागलमध्ये होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ  ( hasan mushriff ) यांनी उभारलेल्या समाजसुधारकांच्या पुतळ्यांचे अनावरण नाना पाटेकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी बोलताना नाना पाटेकर यांनी हसन मुश्रीफ यांच्या कामाचा गौरव केला. पुढच्यावेळी सुद्धा मुश्रीफ साहेब निवडणुकीसाठी उभा राहिले की प्रचाराची गरजच नाही. मुश्रीफ इतके गोंडस आहेत की मर्फीच्या जाहिरातीमधील मुलगा हा मुश्रीफच होते, असे नाना म्हणाले. तसेच केवळ पुतळे उभा करून काय साध्य होणार? सगळे पुतळे आपल्या मनात असायला पाहिजेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, कागलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगांवकर यांच्यासह इतर आमदार आणि कागल तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. वाचा-कुशलची पुन्हा झाली हवा येऊ द्या च्या सेट वर फजिती; आज या गोष्टीमुळे पडला तोंडावर अशोक सराफ यांनी पडत्या काळात मदतीचा हात दिला आज अशोक सराफ यांचा 75 वा वाढदिवस आहे. आज खरं तर मी तिथं असायला पाहिजे होतो. पडत्या काळात अशोक सराफ यांनी मला खूप जपलं आहे. एकेकाळी अशोक सराफ यांना 250 रुपये मिळायचे आणि मला 50 रुपये मिळायचे, अशा शब्दांत आपल्या आठवणींना उजाळा देत नाना पाटेकर यांनी अशोक सराफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment

    पुढील बातम्या