मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Gunratna Sadavarte : सदावर्तेंना पुन्हा झटका, आता मराठा समाजाकडून गंभीर आरोप, पोलिसात तक्रार दाखल

Gunratna Sadavarte : सदावर्तेंना पुन्हा झटका, आता मराठा समाजाकडून गंभीर आरोप, पोलिसात तक्रार दाखल

गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल केली होती. त्यामुळे मराठा समाजाला अद्यापही मराठा आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. याच प्रकरणावरुन आता मराठा समाजही आक्रमक होताना दिसत आहे.

  • Published by:  Chetan Patil

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी

कोल्हापूर, 12 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांच्या मुंबईतील 'सिल्व्हर ओक' (Silver Oak) या निवासस्थानी झालेल्या हल्ल्या प्रकरणी अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल केली होती. त्यामुळे मराठा समाजाला अद्यापही मराठा आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. याच प्रकरणावरुन आता मराठा समाजही आक्रमक होताना दिसत आहे. कारण गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात आता मराठा समाजाच्यावतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिलीप पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. सदावर्ते यांनी मराठा आरक्षण विरोधी केस लढताना बेकायदेशीर पैसे गोळा केले, असा आरोप दिलीप पाटील यांनी केला आहे.

तक्रारीत नेमकं काय म्हटलं आहे?

मराठा आरक्षण विरोधी केस लढताना बेकायदेशीर पैसे गोळा केल्याचा आरोप या तक्रारीत ठेवण्यात आला आहे. तसेच सदावर्तेंनी न्यायमूर्तींच्या विरोधातही अपशब्द वापरल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलिसांत याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. लवकरात लवकर पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावे अन्यथा ते पुरावे नष्ट करतील, अशी भीती तक्रारदार दिलीप पाटील यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सदावर्तेंच्या पत्नीविरोधातही गुन्हा दाखल

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी वकील जयश्री पाटील यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना खोटी आश्वासनं आणि भूलथापा देवून पैसे बळकावले, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे अकोल्यात गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांच्या पत्नी वकील जयश्री पाटील व अन्य 2 जणांविरुद्ध अकोट शहर पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र एसटी कामगार सेना कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी अकोला शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

(राज ठाकरेंच्या सभेला काही तास शिल्लक, सभेपूर्वी संदीप देशपांडेंचं सूचक Tweet)

या प्रकरणावर अकोट पोलीस ठाण्याचे अकोट शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरोक्षक प्रकाश अहिरे यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. "राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. या संपामध्ये सहभागी झाल्यानंतर एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांवर बडतर्फ आणि निलंबन, अशा अनेक कारवाया केल्या होत्या. या कारवायांपासून वाचण्यासाठी औरंगाबाद डेपोचे अजयकुमार गुजर, अकोट आगारातील प्रफुल्ल गावंडे यांच्यामार्फत गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी अॅड. जयश्री पाटील यांनी 74 हजार 400 रुपये अकोट शहरातील कर्मचाऱ्यांचे स्वीकारले होते. तसेच राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांकडून 3 कोटी रुपये भूलथापा देऊन, कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ देणार नाही, असे खोटे आश्वासन देवून या चौघांनी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यांच्याविरोधात आज अकोट शहर पोलीस ठाण्यामध्ये कलम 420 आणि 434 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप कुणालाही अटक झालेली नाही", अशी माहिती पोलीस निरोक्षक प्रकाश अहिरे यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवावस्थानी दोन दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं होतं. याच आंदोलन प्रकरणी सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. सदावर्ते यांनी चिथावणीखोर भाषणे केल्याचा आणि षडयंत्र रचण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 530 रुपये घेतले, असा दावा सरकारी वकिलांनी आज कोर्टात केला. हा दावा सदावर्ते यांची बाजू मांडणारे गिरीश कुलकर्णी यांनीदेखील मान्य करत ते पैसे कर्मचाऱ्यांसाठीच गोळा केल्याचं स्पष्ट केलं. पण याच मुद्द्यावरुन महाराष्ट्र एसटी कामगार सेना कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी अकोला शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अजयकुमार गुजर यांच्यामार्फत फसवणूक केली गेल्याचा आरोप मालोकार यांनी केला आहे.

First published:

Tags: Maratha reservation