मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोल्हापुरात अग्नितांडव, एकापाठोपाठ अनेक दुकानांना लागली आग, घटनास्थळाचा पहिला VIDEO

कोल्हापुरात अग्नितांडव, एकापाठोपाठ अनेक दुकानांना लागली आग, घटनास्थळाचा पहिला VIDEO

(कोल्हापूरमधील घटना)

(कोल्हापूरमधील घटना)

कोल्हापूर शहरातील शिवाजी रोड परिसरातील आज दुपारी दुकानांना आग लागली. एका दुकानाला आग लागली आणि बघता बघता शेजारी असलेल्या इतर दुकानांमध्येही आग पसरली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

अर्जुन नलावडे, प्रतिनिधी

कोल्हापूर, 23 मे : कोल्हापूरमध्ये आगीची मोठी घटना घडली आहे. शहरातील शिवाजी रोड परिसरातील दुकानाला भीषण आग लागली आहे. एका दुकानाला आग लागल्यानंतर शेजारी असलेले आणखी दुकानं आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरातील शिवाजी रोड परिसरातील आज दुपारी दुकानांना आग लागली. एका दुकानाला आग लागली आणि बघता बघता शेजारी असलेल्या इतर दुकानांमध्येही आग पसरली.

दुकानाला लागूनच मोठी लोक वस्ती आणि अनेक दुकानं आहे. दुकानाच्या बाजूच्या घराला सुद्धा आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. आग विझविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे 8 बंब दाखल झाले आहे. सुदैवाने या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नेमकी ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही.

कोल्हापुरातील शिवाजी चौक हे गर्दीचे ठिकाण आहे. या ठिकाणापासून प्रसिद्ध देवस्थान अंबाबाईचे मंदिर आहे. चप्पल ओळ, भवानी मंडप, बिंदू चौक अशी ठिकाणे असल्यामुळे पर्यटकांनी नेहमीच गर्दी असते. सध्या महावितरणकडून वीज बंद करण्यात आली आहे. तर अग्निशमन दलाचे जवान अजूनही आग विझवत आहेत.

First published:
top videos

    Tags: Kolhapur