मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पत्नीच्या मदतीने हनी ट्रॅपमध्ये अडकवलं, कोल्हापुरातील व्यावसायिकाला लाखोंचा गंडा

पत्नीच्या मदतीने हनी ट्रॅपमध्ये अडकवलं, कोल्हापुरातील व्यावसायिकाला लाखोंचा गंडा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

Crime in Kolhapur: कोल्हापुरात एका तरुणानं आपल्या बायकोचा वापर करून एका व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकवलं आहे. आरोपीनं साथीदारांच्या मदतीनं व्यावसायिकाला लाखोंचा गंडा (Extort money) घातला आहे.

  • Published by:  News18 Desk

कोल्हापूर, 27 नोव्हेंबर: मागील काही काळापासून कोल्हापुरात हनी ट्रॅप आणि ब्लॅकमेलिंगची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. गेल्या आठवड्यात कोल्हापुरातील एका तरुणानं हनी ट्रॅपच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असताना कोल्हापुरात हनी ट्रॅपचं (Honey trap) आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. या घटनेत एका तरुणानं आपल्या बायकोचा वापर करून कोल्हापुरातील (Kolhapur) व्यावसायिकाला लाखो रुपयांचा गंडा (Extort money) घातला आहे. आरोपीनं आपल्या काही साथीदारांच्या मदतीनं फिर्यादीला मारहाण (businessman Beaten by group) देखील केली आहे. याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित महिलेसह सर्व आरोपी फरार असून कागल पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मुख्य संशयित महिला प्रिया, प्रियाचा पती, रोहित आणि विजय कलकुटगी अशी गुन्हा दाखल झालेल्या चार आरोपींची नावं असून अन्य दोन आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. संशयित आरोपींनी कोल्हापुरातील लिशा चौक परिसरात व्यापाऱ्याकडून पैसे उकळले आहेत. यातील आरोपी विजय कलकुटगी हा सराईत गुन्हेगार असून हनी ट्रॅप प्रकरणी त्याच्यावर कोल्हापुरात विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा-मुंबईत 20 वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद कृत्य; टेरेसवर भयावह अवस्थेत आढळली पीडित

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक आणि संबंधित महिलेची तिच्या पतीमार्फत पहिल्यांदा ओळख झाली होती. यानंतर तक्रारदार व्यावसायिक आणि आरोपी महिलेचं चॅटींग सुरू होतं. यातूनच त्यांची मैत्री वाढत गेली. आरोपी महिलेनं विश्वास संपादन केल्यानंतर, फिर्यादीला करवीर तालुक्यातील उचगाव, कागल येथील लॉज तसेच सर्विस रोड आणि कोल्हापुरात बोलावून मोबाईलवर अश्लील चित्रीकरण केलं आहे.

हेही वाचा-पुण्यात 52 वर्षीय व्यक्तीचं शाळकरी मुलीसोबत अश्लील कृत्य; आधी कारमध्ये बसवलं मग

या गुन्ह्यात आरोपी महिलेच्या पतीसह अन्य साथीदारांनी मदत केली आहे. यानंतर आरोपींनी संबंधित अश्लील फोटो आणि व्हिडीओज व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादीकडून लाखो रुपये उकळले आहेत. एवढंच नव्हे तर आरोपींनी अनेकदा फिर्यादीला मारहाण देखील केली आहे. संबंधित संतापजनक प्रकार डिसेंबर 2020 पासून फेब्रुवारी 2021 पर्यंत सुरू होता. याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Kolhapur