मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /फोटोग्राफीसाठी तटबंदीवर चढला अन् तोल गेला! महेश मांजरेकरांच्या चित्रपटाच्या शुटिंगवेळी मोठा अपघात

फोटोग्राफीसाठी तटबंदीवर चढला अन् तोल गेला! महेश मांजरेकरांच्या चित्रपटाच्या शुटिंगवेळी मोठा अपघात

पन्हाळ्यावर चित्रपट शुटिंगवेळी मोठा अपघात

पन्हाळ्यावर चित्रपट शुटिंगवेळी मोठा अपघात

पन्हाळा गडावर महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाच्या शुटिंगवेळी एकजण तटबंदीवरून कोसळून गंभीर जखमी झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी

कोल्हापूर, 18 मार्च : 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाचे शुटिंग संपल्यानंतर फोटोग्राफी करताना किल्ले पन्हाळगडावरील सज्जा कोटीवरून एक तरुण दरीत कोसळला. ही घटना रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली. घटना घडल्यानंतर बचावकार्य राबवून जखमी तरुणाला बाहेर काढण्यात आले. सध्या त्याची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहेत.

कशी घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाचे पन्हाळा येथे सज्जा कोठी परिसरात मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना घोड्यांची देखभाल करणारा कर्मचारी तटबंदीवरून खाली पडल्याने जखमी झाला. नागेश खोबरे (रा. सोलापूर) असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याला तातडीने कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

वाचा - एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टमध्ये करणी सेनेचा तुफान राडा; चाहत्यांवर लाठीचार्ज

पन्हाळ्यावर गेल्या दहा दिवसांपासून महेश मांजरेकर निर्मित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. शनिवारी दिवसभर सज्जा कोठी परिसरात चित्रीकरण सुरू होते. रात्री नऊ वाजता चित्रीकरण संपल्यानंतर घोड्यांची देखभाल करणारा नागेश खोबरे हा फोनवर बोलत असताना तोल जाऊन तटबंदीच्या खाली पडला. गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याची नोंद पन्हाळा पोलिस ठाण्यात झाली आहे.

चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी काही महिन्यांपूर्वी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा केली होती. यावेळी चित्रपटामधील सात कलाकारांच्या मुख्य भूमिका आणि त्यांच्या लूकबाबतही सांगण्यात आलं. सध्या हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटामधील सात वीरांची नावं बदलण्याचा आरोप महेश मांजरेकर यांच्यावर करण्यात आला. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, उत्कर्ष शिंदे, सत्या मांजरेकर आदी कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील. आता अभिनेत्री शिवानी सुर्वेच्या नावाची या चित्रपटासाठी वर्णी लागली आहे.

First published:

Tags: Kolhapur