Home /News /maharashtra /

Kolhapur Rain Update : कोल्हापुरात 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट, NDRF च्या तुकड्या सज्ज

Kolhapur Rain Update : कोल्हापुरात 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट, NDRF च्या तुकड्या सज्ज

कोल्हापुरात 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी (Kohlapur Raid Alert) करण्यात आला आहे.

    कोल्हापूर, 6 जुलै : धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून नदीचे पाणी पत्राबाहेर गेले आहे.पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे मात्र ती संथगतीनं आहे.काल (मंदळवार) दिवस भरातला पाणी वाढण्याचा वेग रात्री मंदावला आहे.मात्र 8 जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून NDRF च्या दोन तुकड्या तैनात केल्या आहेत.सध्या पंचगंगा नदी 30 फुटावरून वाहत असून 39 फूट ही इशारा तर 43 फूट ही धोका पातळी आहे.तर जिल्ह्यातले 23 बंधारे पाण्याखाली आहेत. कोकणात पावसाचा प्रचंड हाहाकार सुरु आहे. कोकणात अनेक नद्यांना पूर आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीची देखील माहिती समोर येत आहे. काही भागांमध्ये दरड कोसळल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे धाकधूक वाढली आहे. ज्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतो त्या ठिकाणी नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यांच्याकडून देवाकडे पाऊस थांबण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. विशेष म्हणजे या सर्व नागरिकांसाठी प्रशासनदेखील सतर्क आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर जनावरांना दुसरीकडे स्थलांतरीत केलं जाणार आहे. त्याबाबतची पूर्वसूचना प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. Mumbai Rain Update : मुसळधार पावसामुळे मुंबईची दैना! 5 दिवस पावसाचा जोर असाच राहणार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून याबाबतची माहिती जारी करण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या पाच जिल्ह्यांसाठी 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यात 8 जुलैसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी 9 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Kolhapur, Rain, Rain in kolhapur, Rain updates

    पुढील बातम्या