Home /News /maharashtra /

संततधार पावसाचा पहिला फटका! भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने कोकणात जाणारी वाहतूक खोळंबली, पाहा VIDEO

संततधार पावसाचा पहिला फटका! भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने कोकणात जाणारी वाहतूक खोळंबली, पाहा VIDEO

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात (Heavy rainfall in Kolhapur) पूरस्थिती निर्माण झाली असतानाच विविध दुर्घटना घडल्याचं सुद्धा समोर येत आहे.

    कोल्हापूर, 4 जुलै : राज्यात विविध ठिकाणी पाऊस (Rain in Maharashtra) होत आहे. या पावसामुळे काही ठिकाणी दरड कोसळल्याच्याही (Kolhapur Landslinde) घटना घडत असतात. कोल्हापूर जिल्ह्यातही काल पावसाची रिपरिप सुरू झाली. (Kolhapur Rain) जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पावसाचे प्रमाण वाढत आहे. घाटमाथ्यावरील तालुक्यांसह पूर्वेकडील तालुक्यात पाऊस सुरू झाला. यातच कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापुरातील एका ठिकाणी ठिकाणी दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे. याठिकाणी कोसळली दरड - कोल्हापुरातील पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. मात्र, कोल्हापुरातून एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. येथील भुई बावडा घाटात दरड कोसळली आहे. तसेच गगनबावडा राजापूर मार्गावर दरड कोसळली. त्यामुळे दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हेही वाचा - कोल्हापूर : बंद पडलेल्या कंटेनरला कारची तर अपघातग्रस्त कारला ट्रकची धडक, विचित्र तिहेरी अपघातात चौघांचा मृत्यू कोल्हापुरात सुरू असलेल्या पावसाचा पहिला फटका हा बसल्याचे समोर आले आहे. भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने कोकणात जाणारी वाहतूक खोळंबली आहे. तसेच गगनबावडा राजापूर मार्गावर दरड कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Kolhapur, Rain in kolhapur

    पुढील बातम्या