कोल्हापूर, 29 नोव्हेंबर : कोल्हापूर शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या शिवाजी पार्क येथील सनराइज् हॉस्पिटल समोरच्या झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. लागलेल्या आगीत चार ते पाच झोपड्या आगीत जळून पूर्णपणे भस्मसात झाल्या आहेत. दरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु हातावरचे पोट असल्याने प्रापंचिक साहित्याचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत अग्निशमन दलाला माहिती दिल्याने अग्निशमन दलाचे जवान आणि चार बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या शिवाजी पार्क परिसरातील सनराईज हॉस्पिटल समोर असणाऱ्या झोपडपट्टीत आज (दि. 29) दुपारच्या दरम्यान अचानक आग लागली. या आगीत चार ते पाच झोपडी वजा घरे जळून खाक झाली. दरम्यान आगीचे लोट येत असल्याने बाजुच्या घराणांही या फटका बसला आहे. अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझवण्याचे काम सुरू आहे.
हे ही वाचा : एक फोन अन् मंदिर रिकामं , भाविकांमध्ये घबराट, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नेमंक काय घडलं?
शिवाजी पार्क येथील झोपडपट्टीमध्ये प्लास्टिक आणि भंगारचे साहित्य मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आग नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाला शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत. एका घरात आगलेली आग आसपासच्या घरांमध्ये पसरली. कमी जागेमुळे एकमेकाला घरे लागून असल्याने सलग घरे जळाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. एका घरातील दोन गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे आगीचा भडका उडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा : प्रकाश आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी, आरपीआयच्या कोकण अध्यक्षाची पक्षातून हकालपट्टी
आग लागताच परिसरातील नागरिकांनी घरातील साहित्य बाहेर काढले अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत घरांचे आणि झोपड्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीमध्ये घरे जळून खाक झाल्याने अनेकांच्या संसाराची राख झाली, त्यामुळे महिलांनी टाहो फोडला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.