कोल्हापूर, 26 नोव्हेंबर : मागच्या दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर उत्तरचे माजी आमदार राजेश क्षिरसागर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. राजेश क्षिरसागर यांच्या वाढदिनी मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या गुंडाने वाढदिवसाचे मोठे फलक लावल्याने वाद निर्माण झाला होता. यावेळी कोल्हापूर पोलिसांनी तातडीने कारवाई बडगा उगारला होता. दरम्यान हे प्रकरण शांत झाले नाही तोपर्यंत राजेश क्षिरसागर यांच्यावर ठाकरे गटाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.
हे ही वाचा : काहीजण 40 XX घेऊन तिकडे गेलेत, पण.. उद्धव ठाकरे यांचा थेट मुख्यमंत्र्यावर वार
माजी आमदार राजेश क्षिरसागर यांनी तलवारी सारख्या धारदार शस्त्राने वाढदिवसाच्या केक कापून वाढदिवस साजरा केला आहे. हा एकप्रकारने गुन्हा असुन त्याबद्दल त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी आज (दि. 26) शनिवारी लक्ष्मीपुरी पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. या निमित्ताने शिवसेनेच्या दोन गटातील वाद उफाळला असल्याचे दिसून येत आहे.
कोल्हापूरसारख्या शांतताप्रिय शहरात वाढदिवसानिमित्त गुन्हेगारीला चालना देण्याचे, दहशत माजवण्याचे काम राजेश क्षीरसागर यांनी केल्याचे दिसून येत आहे. शहरात बेकायदेशीर फलक लागले आहेत. त्यावर गुन्हेगारांची प्रतिमा आहे.
वाढदिनी सायंकाळी राजेश क्षीरसागर व त्यांचे कार्यकर्ते धारदार तलवारीने केक कापत असल्याचे व्हिडीओ समाज माध्यमात अग्रेषित झाले आहेत. त्यामुळे भारतीय हत्या अधिनियम कायदा प्रमाणे त्यांनी गुन्हा केलेला आहे. तलवार सारखे शस्त्र बाळगणे शिक्षेस पात्र ठरते, असे निवेदनात नमूद केले आहे.
हे ही वाचा : देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची तरी लाज.. ठाकरेंनी भरसभेत तो व्हिडीओ केला प्ले
बेकायदेशीर फलक लावून महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायद्याप्रमाणे गुन्हा केला आहे. त्यामुळे क्षीरसागर यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले व सहकार्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.