मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Kolhapur Rain Flood : कोल्हापूरमध्ये पाऊस थांबला पण महापुराचे सावट कायम, 50 पेक्षा जास्त प्रमुख मार्गांवरील वाहतूक अद्यापही बंद

Kolhapur Rain Flood : कोल्हापूरमध्ये पाऊस थांबला पण महापुराचे सावट कायम, 50 पेक्षा जास्त प्रमुख मार्गांवरील वाहतूक अद्यापही बंद

कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाने उसंत दिला आहे. (Kolhapur Rain Flood) परंतु पाणी पातळीत कोणतीही घट न झाल्याने आणखी पाऊस झाल्यास कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाने उसंत दिला आहे. (Kolhapur Rain Flood) परंतु पाणी पातळीत कोणतीही घट न झाल्याने आणखी पाऊस झाल्यास कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाने उसंत दिला आहे. (Kolhapur Rain Flood) परंतु पाणी पातळीत कोणतीही घट न झाल्याने आणखी पाऊस झाल्यास कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे.

  • Published by:  Sandeep Shirguppe

कोल्हापूर, 13 ऑगस्ट : मागच्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाने उसंत दिला आहे. (Kolhapur Rain Flood) परंतु पाणी पातळीत कोणतीही घट न झाल्याने आणखी पाऊस झाल्यास कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले. यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान मागच्या 24 तासांपासून 41.8 इंच इतकी पाणी पातळी होती ती तशीच राहिली आहे. यामुळे महापुराचे सावट कायम आहे.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस असल्याने धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ होत आहे. काल (दि.12) भुईबावडा घाटात दुपारी दरड कोसळली. यामुळे गगनबावडामार्गे कोकणात जाणारी अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. याचबरोबर काल दुपारपर्यंत राधानगरी धरणाचे पाच दरवाजे खुले होते. धरण परिसरातील पावसाचा जोर कमी झाल्याने दिवसभरात 2 दरवाजे बंद झाले आहेत. सध्या धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले असून त्यातून 5 हजार 884 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

हे ही वाचा : VIDEO:..अन् शेवटी ब्लँकेटची झोळी करून गरोदर महिलेला रुग्णालयात नेलं; नाशिकमधील मनाला चटका लावणारं दृश्य

तुळशी धरण 95 टक्के भरले

तुळशी धरण 95 टक्के भरल्याने सकाळी दहापासून धरणातून 1 हजार 750 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. पावसाची उघडीप व राधानगरीचा विसर्ग कमी झाल्याने पंचगंगेची पाणी पातळी 41.8 फुटांवर स्थिर राहीली. 

कोकणातील वाहतूक फोंडा घाटमार्गे

भुईबावडा घाटात दुपारी दरड कोसळली. करूळ घाटातही यापूर्वीच दरड कोसळल्याने मोठ्या व अवजड वाहनांची वाहतूक बंद होती. ती भुईबावडामार्गे सुरू होती, तीही आता बंद झाली. यामुळे कोकणात जाणारी वाहतूक फोंडा घाटमार्गे वळवण्यात आली आहे. शाहूवाडी तालुक्यातील करंजफेण येथील खिंडीतही भूस्खलन झाले. मात्र कोसळलेली दरड बाजूला हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

हे ही वाचा : महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, 16 जिल्ह्यांसाठी अलर्ट, 4 जिल्ल्यांमध्ये धुवाँधार, विकेण्डचे 2 दिवस महत्त्वाचे

कसबा बावडा शिये मार्ग सुरू

कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर केर्ली ते केलें दरम्यान आजही रस्त्यावर पाणी होते. यामुळे त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गेच सुरू होती. कोल्हापूर राधानगरी रस्त्यावर हळदीत पाणी आले. मात्र त्यातूनही वाहतूक सुरू होती. कसबा बावडा-शिये मार्गावरील पाणी ओसरल्याने त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. ५४ मार्गावरील वाहतूक बंदच

जिल्ह्यातील ७३ बंधाऱ्यांवर अद्याप पाणी आहे. यामुळे त्यासह ५४ मार्गावरील वाहतूक बंदच आहे. ही सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. पावसाचा जोर पूर्ण ओसरला असून शुक्रवारी ऊनही पडले होते. तसेच धरणाचा विसर्ग कमी झाल्याने पंचगंगेसह अन्य नद्यांच्या पाणी पातळी कमी होण्यास मदत होणार आहे. पावसाने उघडीप दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

First published:

Tags: Kolhapur, Monsoon, Radhanagri, Rain in kolhapur

पुढील बातम्या