ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधीकोल्हापूर, 2 जून : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur district) पन्हाळ्यात (Panhala) आकाशात तबकडी सदृश्य वस्तू दिसून आली आहे. पांढर्या शुभ्र रंगाची तबकडी सारखी वस्तू दिसल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. पन्हाळा येथील निवासी रमेश पाटील यांनी आपल्या मोबाइलमध्ये ही दृश्य कैद केली आहेत. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्यासोबतच नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. (Kolhapur news unidentified object seen in sky at panhala area live video goes viral watch it)
पन्हाळगडाच्या पश्चिमेकडून हळूहळू ही वस्तू उत्तरेच्या दिशेने सरकताना पाहण्यात आले. पन्हाळा येथील रमेश पाटील यांनी आपल्या मोबाइलमध्ये वस्तूचे शूटिंग केलं. अतिशय मंद गतीने तबकडी सारखी ही वस्तू उत्तरेच्या दिशेला सरकत होती.
ही वस्तू आकाशात खूप उंचावर होती. मात्र, नागरिकांना आपल्या डोळ्यांनी सहज पाहता येत होती. ही वस्तू तबकडी सदृश्य असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आकाराने गोल आणि पांढऱ्या शुभ्र चकाकत असल्याचं नागरिकांनी पाहिलं. त्यामुळे नेमकं आकाशात दिसणारी ही वस्तू आहे तरी काय? असा प्रश्न आता कोल्हापुरकरांना पडला आहे.
वाचा : साकीनाका बलात्कार-हत्या प्रकरण; दोषीला फाशी देण्याची मागणी, आज कोर्ट देणार निकाल
तबकडी सदृश्य वस्तू कोल्हापुरात आकाशात दिसून आल्याचं वृत्त सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने पसरलं आणि त्याचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहे. त्यामुळे ही वस्तू नेमकी काय आहे? याबाबत आता अवकाश संशोधन संस्थेकडून सुद्धा माहिती घेण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
गेल्यावर्षी इस्लामाबादेत लखलखणारी उडती तबकडी
गेल्यावर्षी पाकिस्तानात सुद्धा उडती तबकडी पाहण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. पाकिस्तानच्या डोमेस्टिक फ्लाइटच्या पायलटसह विमानातल्या अनेकांनी आपल्याला UFO किंवा उडती तबकडी दिसल्याचा दावा केला होता. ही तबकडी नेमकी कशी दिसली, ते काय असू शकतं याबाबत वेगवेगळी स्पष्टीकरणं पुढे आली होती. या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी UFO वर (Unidentified flying object)चर्चा सुरू झाली होती.
विमान उंच आकाशात असताना ही झळाळती तबकडी पायलटला दिसली आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला होता. सूत्रांनी सांगितल्यानुसार, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या पायलटनं (pilot) रहीम यार खान या क्षेत्राजवळ ही युएफओ पाहिली. एअरबस ए -320 ही नेहमीची फ्लाइट उडवताना त्याला ही यूएफओ दिसली. लाहोर ते कराचीदरम्यान हे विमान होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.