Home /News /maharashtra /

VIDEO : '...तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही', कोल्हापूरच्या नव दाम्पत्याची अनोखी शपथ, चक्क पाण्याच्या टँकरवरुन वरात

VIDEO : '...तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही', कोल्हापूरच्या नव दाम्पत्याची अनोखी शपथ, चक्क पाण्याच्या टँकरवरुन वरात

कोल्हापुरातील एका नव दाम्पत्याने अनोख्या पद्धीने प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या दाम्पत्याने अतिशय अनोख्या पद्धतीने लग्नाची वरात काढून पाणीटंचाईच्या प्रश्नावर भाष्य केलं आहे.

    कोल्हापूर, 7 जुलै : महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांमध्ये सध्या प्रचंड पाऊस पडत असला तरी काही भागांमध्ये अद्यापही पाऊस पोहोचलेला नाही. राज्यातील अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाईची समस्या आहे. या पाणीटंचाईला अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जाते. प्रशासनाने आपल्याकडे लक्ष द्यावं म्हणून नागरिकांकडून आंदोलने केली जातात. पण कोल्हापुरातील एका नव दाम्पत्याने अनोख्या पद्धीने प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या दाम्पत्याने अतिशय अनोख्या पद्धतीने निदर्शने देत पाणीटंचाईच्या प्रश्नावर भाष्य केलं आहे. जोपर्यंत घराच्या परिसरात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही, अशी शपथ घेत कोल्हापुरात नवदाम्पत्याने आज चक्क पाण्याच्या टँकरवरून वरात काढली. त्यांची ही वरात चर्चेचा विषय ठरली. विशाल कोळेकर आणि अपर्णा साळुंखे हे आज विवाहबद्ध झाले. त्यांनी अभिनव पद्धतीनं ही वरात काढत पाणीटंचाईवर प्रशासनाचे लक्ष वेधलं. (Google की Facebook? जॉबसाठी नक्की कोणती कंपनी आहे बेस्ट; अशी असते Career Growth) 'बायकोला त्रास नको म्हणून थेट हुंडा म्हणून टँकरच घेतल्याचा' लक्षवेधी फलक या वरातीमध्ये लावण्यात आला होता. हलगी घुमक्याच्या तालात मंगळवार पेठेतून ही वरात निघाली. या अनोख्या लग्नाच्या वरातीचे व्हिडीओ आता सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत. आपल्याला भेडसावणाऱ्या समस्यांवर अशा मार्मिक पद्धतीने भाष्य करणे हे अतिश्य योग्य असल्याची भावना सर्वसामन्यांकडून व्यक्त केली जात आहे. (एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरे पुन्हा येणार एकत्र? पडद्यामागे नेमकं काय आहे सुरू?) या वरातीच्या व्हारल होणाऱ्या व्हिडीओत सगळ्याच गोष्टी हटके दिसत आहेत. नवरदेव-नवरी हे पाण्याच्या टँकरवर बसले आहेत. हलगी घुमक्याच्या तालावर वऱ्हाडी मंडळी नाचत आहेत. अतिशय दणकेबाज वातावरण आहे. आपल्या गल्लीत पाण्याची समस्या आहे. ही समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी नवं दाम्पत्याने अतिशय योग्य पाऊल उचलले आहे. लग्नातील होर्डिंग्ज आणि टँकरवर लिहिलेला मजकूर पाहून प्रशासनाला जाग आणण्यासाठी या दाम्पत्याने अनोख्या पद्धतीने आणि अतिशय ठासून आपली समस्या मांडली आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Kolhapur

    पुढील बातम्या