ज्ञानेश्वर साळोखे (कोल्हापूर), 01 एप्रिल : कोल्हापूर महानगरपालिकेने आता एक महत्वपूर्ण उचलेले आहे. कोल्हापुरात विनापरवाना जाहिरात केल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कारण अशा जाहिरातीवर महापालिकेने गुन्हे दाखल करायला सुरुवात केली असून यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. मात्र हेच धाडस राजकीय पक्षांच्या जाहिरातीबाबत प्रशासन दाखवणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
कोल्हापुरात विनापरवाना जाहिरात करणे आता चांगलेच महागात पडणार आहे. महापालिकेने याबाबत कडक पावले उचलायला सुरवात केली आहे.
जे केलं ते योग्यच! गोडसे नसते तर भारताचा नाश झाला असता, कालीचरण महाराज पुन्हा बडबडले
शहर विद्रुपीकरण कायद्यांतर्गत विनापरवाना जाहिराती करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करायला सुरुवात केली आहे. यामध्ये भिंतींवर लावलेल्या छोट्या जाहिरातींचाही समावेश आहे.
या जाहिराती कोणी लावल्या या स्पष्ट होत नसल्याने त्यावर असलेल्या मजकूर आणि संपर्कासाठी दिलेल्या मोबाईल यावरच गुन्हे दाखल करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अशा जाहिराती करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. भिंतीवर लावलेल्या जाहिराती तर ह्या कारवाईमुळे एका रात्रीत गायब झाल्या आहेत.
महापालिकेने यासाठी स्वतंत्र पथकच नेमले असून अशा जाहिरातबाजांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. महापालिकेने छोट्या जाहिरातदारांवर ही कारवाई सुरू केली आहे.
हे कोल्हापुरातच होऊ शकतं; दहावीची पेपर संपला अन् पोरं झाली बेभान, Video व्हायरल
मात्र राजकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात पोस्टर बाजी मोठ्या प्रमाणात होते.काही पोस्टर तर वाहतुकीस अडथळा होण्यासारखे आणि रस्त्याच्या मधोमध उभे केलेले असतात त्यांच्यावर सुद्धा अशी धाडसी कारवाई करण्याची गरज आहे.तरच ही कारवाई सर्वसमावेशक होईल अन्यथा हा केवळ फार्स ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.