Home /News /maharashtra /

Kolhapur Prashant Jadhav : शहीद प्रशांत जाधव यांच्या पत्नीचे कुंकू कायम, गावकऱ्यांनी जपला शाहूंचा वारसा

Kolhapur Prashant Jadhav : शहीद प्रशांत जाधव यांच्या पत्नीचे कुंकू कायम, गावकऱ्यांनी जपला शाहूंचा वारसा

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमधील (Kolhapur district gadhinglaj) बसर्गे बुद्रुक येथील प्रशांत शिवाजी जाधव (वय २७) त्यांच्या निधनाची माहिती मिळताच कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली. (Kolhapur Soldier prashant jadhav)

  कोल्हापूर, 29 मे : लडाखमध्ये 26 जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात होऊन 7 जवानांचा मृत्यू झाला. (Kolhapur Prashant Jadhav) या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमधील (Kolhapur district gadhinglaj) बसर्गे बुद्रुक येथील प्रशांत शिवाजी जाधव (वय २७) त्यांच्या निधनाची माहिती मिळताच कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली. (Kolhapur Soldier prashant jadhavप्रशांत जाधव यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मुळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान जिल्ह्यातील हेरवाड, माणगाव, कोरोची या गावांनी  विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेऊन राजर्षी शाहू महाराजांना अनोखी मानवंदना दिली. 

  दरम्यान शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या बसर्गे गावामध्येही त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर विधवा प्रथा बंद करण्यात आली. गावाने एकमताने हा निर्णय घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्याचा पुरोगामी पणा पुन्हा दिसून आला आहे. त्यामुळे प्रशांत जाधव यांच्या पत्नी पद्मा यांचं कुंकू कायम राहिले आहे.

  हे ही वाचा : 'शेजाऱ्याच्या घरात जरी पाळणा हलला तरी पेढे वाटायचे', सदाभाऊंची राष्ट्रवादीवर खोचक टीका

  अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या अलोट जनसागराने पुष्पवृष्टी करत जाधव यांच्या पार्थिवाला अखेरची मानवंदना दिली. दरम्यान, शहीद प्रशांत जाधव आणि सातारचे शहीद सुभेदार विजय सर्जेराव शिंदे राज्य सरकारकडून प्रत्येकी रु.१ कोटींची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली.

  शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या पश्चात पत्नी पद्मा, अवघ्या 11 महिन्यांची मुलगी नियती, वडिल शिवाजी आणि आई रेणुका असा परिवार आहे. प्रशांत आठ वर्षांपूर्वीच म्हणजेच 2014 मध्ये बेळगावमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती झाले होते. त्यांचा पद्मा यांच्याशी 2020 मध्ये विवाह झाला होता. त्यांना अवघ्या 11 महिन्यांची नियती कन्या आहे.

  हे ही वाचा : नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल एकाच व्यासपीठावर, राजकीय चर्चांना उधाण

  दरम्यान, थोइसपासून 25 किलोमीटर अंतरावर लष्करी जवानांच्या बसला अपघात झाला. जवानांची बस श्योक नदीत कोसळली. बसमध्ये 26 जवान होते. बस 50 ते 60 फूट खोल कोसळल्याने जवळपास सगळेच जवान जखमी झाले. अपघातानंतर त्यांना उपचारांसाठी परतापूर येथील 403 फील्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्जिकल टीमला लेहहून परतापूरला पाठवण्यात आले आहे.

  महाराष्ट्र शासनाकडून एक कोटी जाहीर

  व्यर्थ न हो बलिदान..!
  लडाखच्या तुर्तकमध्ये भारतीय लष्कराची बस नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत वीरमरण आलेले कोल्हापूरचे सुपुत्र जवान प्रशांत शिवाजी जाधव यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी बसर्गे (ता.गडहिंग्लज) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज अतिशय शोकाकुल वातावरणात, आपल्या वीर जवानाला अंतीम निरोप देण्यासाठी जमलेल्या जनसागराने पुष्पवृष्टी करत जाधव यांच्या पार्थिवाला अखेरची मानवंदना दिली. शहीद जवान प्रशांत जाधव व शहीद सुभेदार विजय सर्जेराव शिंदे (सातारा) यांच्या कुटुंबियांच्या पाठीमागे महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे असून त्यांना राज्य सरकारकडून प्रत्येकी रु.१ कोटींची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे सतेज पाटील यांनी फेसबुकद्वारे आवाहन केले.
  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Kolhapur

  पुढील बातम्या