मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Kolhapur Kalmba Jail Suicide : राबून खायच्या वयात कुख्यात गुंड बनला अन् जेलमध्ये जाऊन केली आत्महत्या, कोल्हापुरातील घटना

Kolhapur Kalmba Jail Suicide : राबून खायच्या वयात कुख्यात गुंड बनला अन् जेलमध्ये जाऊन केली आत्महत्या, कोल्हापुरातील घटना

सांगली जिल्ह्यातील मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या कैद्याने आत्महत्या केल्याची घटना कळंबा कारागृहात घडली आहे. दरम्यान कैद्याने आत्महत्या केल्याने कळंबा कारागृह प्रशासन हादरले आहे. (Kolhapur Kalmba Jail Suicide)

सांगली जिल्ह्यातील मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या कैद्याने आत्महत्या केल्याची घटना कळंबा कारागृहात घडली आहे. दरम्यान कैद्याने आत्महत्या केल्याने कळंबा कारागृह प्रशासन हादरले आहे. (Kolhapur Kalmba Jail Suicide)

सांगली जिल्ह्यातील मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या कैद्याने आत्महत्या केल्याची घटना कळंबा कारागृहात घडली आहे. दरम्यान कैद्याने आत्महत्या केल्याने कळंबा कारागृह प्रशासन हादरले आहे. (Kolhapur Kalmba Jail Suicide)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 08 सप्टेंबर : सांगली जिल्ह्यातील मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या कैद्याने आत्महत्या केल्याची घटना कळंबा कारागृहात घडली आहे. दरम्यान कैद्याने आत्महत्या केल्याने कळंबा कारागृह प्रशासन हादरले आहे. (Kolhapur Kalmba Jail Suicide) कळंबा कारागृहातील सर्कल क्रमांक सात शौचालयालगत असलेल्या भिंतीजवळ आत्महत्या केल्याचा प्रकार पहाटे उघड झाला. कळंबा कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यासह राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जाधव यांच्यासह अधिकाऱ्यांनी पहाटे घटना स्थळाची पाहणी करून पोस्टमार्टम करण्यासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला.

सांगली जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्याचे रेकॉर्ड असलेल्या आणि मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या कापडी पट्टीने गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना गुरुवारी पहाटे मध्यवर्ती कळंबा जेलमध्ये घडली. भरत बाळासाहेब घसघसे (वय 29, रा. वाडकर गल्ली, आष्टा, जिल्हा सांगली) असे त्याचे नाव आहे.

हे ही वाचा : Ahmednagar Police : अहमदनगरमध्ये अचानक कलम 144, पोलीस बंदोबस्त वाढवला

गर्दी, मारामारीसह बेकायदा शस्त्रे कब्जात बाळगल्या प्रकरणी भरत घसघसेविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. 2019 मध्ये घसघसेसह सहा साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. सध्या त्याची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली होती.

सध्या त्याची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली होती. आज मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. कळंबा कारागृहातील अन्य कैद्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर जेलचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकारामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.

गणेशोत्सवाला गालबोट, धक्कादायक घटनेने कोल्हापूर हादरलं

कोल्हापूरमध्ये गणेशोत्सवनिमित्त आयोजित महाप्रसादावेळी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. जेवणाच्या पंगतीत मानाने पाणी सोडण्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत 5 जण गंभीर जखमी झाले. यावेळी एकाने गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. हाणामारीदरम्यान काठ्या, दगडांचा वापर केला गेला. गोळीबार करणाऱ्या 12 जणांच्यावर गुन्हा नोंद झालाय. तर 10 जणांना अटक करण्यात आलीय.

हे ही वाचा : 'मग सुरक्षा काढून टाका', पोलिसांच्या कुटुंबीयांनी नवनीत राणांना सुनावलं

संबंधित घटना ही कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील मांडरे गावात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गावात अतिशय भयानक राडा झालाय. या राड्यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. घटनेनंतर गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी या घटनेप्रकरणी दहा जणांना अटक केली आहे. तर बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु आहे.

First published:
top videos

    Tags: Kolhapur, Sangli, Sangli (City/Town/Village), Suicide, Suicide news