मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Kolhapur Gender Screening : शाहूंचा वारसा बस्तानात बांधून, कोल्हापूर गर्भलिंग तपासणीचे हब, मुलींचे प्रमाण घटले

Kolhapur Gender Screening : शाहूंचा वारसा बस्तानात बांधून, कोल्हापूर गर्भलिंग तपासणीचे हब, मुलींचे प्रमाण घटले

 एकेकाळी सायलेंट ऑब्झरव्हरने गर्भलिंग चाचण्या रोखण्यात आघाडीवर असलेलं कोल्हापूर आता गर्भलिंग तपासणीचे हब बनले आहे.

एकेकाळी सायलेंट ऑब्झरव्हरने गर्भलिंग चाचण्या रोखण्यात आघाडीवर असलेलं कोल्हापूर आता गर्भलिंग तपासणीचे हब बनले आहे.

एकेकाळी सायलेंट ऑब्झरव्हरने गर्भलिंग चाचण्या रोखण्यात आघाडीवर असलेलं कोल्हापूर आता गर्भलिंग तपासणीचे हब बनले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

ज्ञानेश्वर साळोखे (कोल्हापूर), 18 जानेवारी : एकेकाळी सायलेंट ऑब्झरव्हरने गर्भलिंग चाचण्या रोखण्यात आघाडीवर असलेलं कोल्हापूर आता गर्भलिंग तपासणीचे हब बनले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सहाशेहून अधिक गर्भलिंग तपासणी केंद्र असल्याचा अंदाज असून दोन ठिकाणी छापा टाकत पोलिसांनी ते नेस्तनाबूत केलेत.या कारवाईने एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या रडारवर आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

कोल्हापूर बनलंय गर्भलिंगनिदानाचे हब

कोल्हापूर पोलीस आणि आरोग्य विभागाने काल दोन ठिकाणी छापा टाकून गर्भलिंगनिदान आणि गर्भपाताचे बिंग फोडलं. राधानगरी आणि भुदरगड तालुक्यात सुरू असलेल्या या केंद्रावर पोलिसांनी स्वतःहून पेशंट बनत छापा टाकला. या छाप्यात गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात येणारे मशीन आणि गर्भपाताची औषधे पोलिसांच्या हाती लागली.पोलिसांनी याबाबत चार जणांना अटक केली आहे.

हे ही वाचा : खाशाबा जाधव यांची गुगलने दखल घेतली पण.., संभाजीराजे सरकारवर नाराज

बारावी नापास असलेले बनावट डॉक्टर ही केंद्र चालवत रुग्णाच्या आयुष्याशी खेळ खेळत होते. अनेक एजेंटांच्या मार्फत ही साखळी सुरू होती. त्यांच्याकडे गर्भपाताची औषधेही सापडली आहेत. त्यामुळे अनेक कळ्या गर्भातच खुडल्याचे स्पष्ट होत आहे.

या सगळ्या प्रकारची गंभीर दखल कोल्हापूरचे एसपी शैलेश बलकवडे यांनी घेतली आहे. या प्रकरणात आंतरराज्य टोळी कार्यकरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. ही साखळी मोडीत काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तर अवैध धंद्यातून जमवलेली माया जप्त करण्याचीही कारवाई करण्याची कार्यवाहीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापुरात सध्या मुलांच्या तुलनेत साडेआठशे मुली इतकं व्यस्थ प्रमाण आढळून येत आहे. मुली लग्नाला मिळतं नाहीत म्हणून परराज्यातून मुली आणाव्या लागत आहेत. मात्र त्यातूनही अनेकांची फसवणूक झाली आहे. मात्र त्यातून बोध न घेता गर्भातच कळ्या खुंटल्या जात आहेत.

हे ही वाचा : बाबा गेले, आईलाही हवीये साथीदाराची गरज; कोल्हापूरच्या लेकाने जाणलं आईचं मन

कोल्हापुरात दिवसा ढवळ्या गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे प्रकार पुढे आल्याने सामाजिक प्रश्नही निर्माण झाला आहे. मात्र अशी केंद्र चालवणाऱ्यांना नेमके अभय कोणाचे मिळते हा खरा प्रश्न आणि केवळ ग्रामीण भागात नाही तर शहरी भागातही अशी काळी कृत्य चालत असून असे प्रकार नेस्तनाबूत करण्याची गरज आहे.

First published:

Tags: Kolhapur