मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : विसर्जनादिवशी कोल्हापूरकर बेभान, तब्बल 5 डंपर चपलांचा खच उचलला; कर्मचारीही हैराण! 

Video : विसर्जनादिवशी कोल्हापूरकर बेभान, तब्बल 5 डंपर चपलांचा खच उचलला; कर्मचारीही हैराण! 

विसर्जन मिरवणुकीत इतकी गर्दी होती की, अक्षरश: पाय ठेवायलाही जागा नव्हती.

विसर्जन मिरवणुकीत इतकी गर्दी होती की, अक्षरश: पाय ठेवायलाही जागा नव्हती.

विसर्जन मिरवणुकीत इतकी गर्दी होती की, अक्षरश: पाय ठेवायलाही जागा नव्हती.

  • Published by:  Meenal Gangurde
कोल्हापूर, 11 सप्टेंबर : यंदा कोरोनाचं सावट नसल्याने राज्यभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणेश विसर्जनाच्या दिवशी तर ठिकठिकाणी नागरिकांनी वाजत-गायत मिरवणूक काढली आणि यात मनसोक्त डान्सही केला. यादिवशी कोल्हापूरातील रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती. याचे अनेक व्हिडीओदेखील व्हायरल झाले होते. दरम्यान आज रस्त्यांची स्वच्छता करीत असताना ठिकठिकाणी चपलांचा खच पडलेला होता. कोल्हापूरच्या विसर्जन मिरवणुकीत तब्बल पाच डंपर चपलांचा खच जमा करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी पाय ठेवायलाही जागा नव्हती. रात्रभर नागरिक रस्त्यांवर फिरत होते. इतकी गर्दी होती की, वाऱ्याप्रमाणे माणसे झुलत होती. त्यात अनेकांना पायातली चप्पल सांभाळणे सुद्धा जिकरीचे झाले होते. त्यामुळे आज ज्यावेळी महापालिकेने स्वच्छता हाती घेतली, त्यावेळी तब्बल पाच डंपर चप्पले सापडली आहेत. काय ती गर्दी काय तो चपलांचा ढीग आणि आता रस्ता एकदम ओके मध्ये असच महाद्वार रोड बाबत म्हणावे लागेल.
First published:

Tags: Kolhapur

पुढील बातम्या