मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /kolhapur Farmer Murder : शेतीचा वाद जिवावर बेतला, 7 जणांच्या मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू, कोल्हापुरातील घटना

kolhapur Farmer Murder : शेतीचा वाद जिवावर बेतला, 7 जणांच्या मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू, कोल्हापुरातील घटना

खून, मारामाऱ्या यासारख्या घटनांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

खून, मारामाऱ्या यासारख्या घटनांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

खून, मारामाऱ्या यासारख्या घटनांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 17 फेब्रुवारी : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. खून, मारामाऱ्या यासारख्या घटनांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान कागल तालुक्यातील मौजे सांगाव या गावात शेतीच्या रस्त्यावरून झालेल्या वादात शेतकऱ्याचा खून करण्यात आला आहे. याबाबत कागल पोलिसांना 7 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यात असणाऱ्या कागल तालुक्यातील मौजे सांगाव काल शेतीच्या वादातून मारहाणीत एकाचा जीव गेला आहे. शेतातील रस्त्याच्या वादातून झालेल्या मारामारीत गंभीर जखमी झालेले शेतकरी मारुती हरी पाटील (वय 65) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याबाबत कागल पोलिसांनी सात जणांवर गुन्हा नोंद केला आहे.

हे ही वाचा : Ram Mandir Ayodhya : प्रेयसीच्या भावाला अडकवण्यासाठी राम मंदिर उडवण्याची दिली धमकी, अखेर असा झाला शेवट

मयत मारुती पाटील यांच्या शेतातून मुरूम टाकून रस्ता करण्याच्या वादातून बुधवारी (दि. 15) सकाळी मारामारी झाली. पाटील यांना काठी व खोऱ्याने मारहाण झाल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नातवंडे, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

हे ही वाचा : ज्याला लहानाचं मोठं केलं, त्यानेच घरात पाडला आई-वडिलांच्या रक्ताचा सडा, कोल्हापूर हादरलं

कागल पोलिसांनी कृष्णात पाटील (वाडकर) एकनाथ केरबा पाटील, रघुनाथ कृष्णात पाटील, महादेव दत्तू पाटील, प्रकाश महादेव पाटील, यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संबंधितांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये महिलांचाही समावेश असून अधिक तपास कागल पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षिका खडके व ठाणे अंमलदार शिंगारे करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Kolhapur, Murder, Murder news