साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर, प्रतिनिधी : कोल्हापुरात कोणती गोष्ट मिळू लागली, की त्या गोष्टीची चर्चा सर्वत्र होऊ लागते. उन्हाळ्याच्या दिवसात एक पेय सध्या कोल्हापुरात चर्चेचा विषय बनलंय. ते पेय म्हणजे दूधरस.. दुधाचा वापर असणारे हे पेय सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या पसंतीस पडत आहे.
कुठे मिळतो दूधरस?
कोल्हापुरातील शिवाजी पेठेत असणाऱ्या साकोली कॉर्नर या ठिकाणी थंडाई आणि ऊसाचा रस मिळणारे एक जुने दुकान आहे. 1983 सालापासून लक्ष्मण राणगे हे या ठिकाणी ऊसाचा रस विकत आहेत. सध्या त्यांचा मुलगा विजय हे दुकान चालवतात. लक्ष्मण मामा हे पैलवानकी करत त्यामुळे पैलवनांसाठी बनवण्यात येणारी खास बदाम थंडाई त्यांनी कोल्हापूरच्या खवय्यांसाठी आणली. या थंडाईला कोल्हापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर त्यांनी दुधरस हे एक नवे पेय सर्वांसाठी आणले आहे. या पेयाची चव देखील सर्वांच्या जीभेवर रेंगाळतीय.
काय आहे दूध रस?
दूध रस हे पैलवानांचे पेय म्हणून ओळखले जाते. त्यांना ऊसाचा रस जास्त प्रमाणात पिता येत नाही. त्यामुळे पैलवानांना दुधामध्ये मिसळून हे पेय दिले जात असे. पैलवानांचे हे पौष्टिक पेय विजय यांनी कोल्हापूरकरांसाठी आणले. दूध रस म्हणजे वेगळे काही नसून उसाचा रस आणि ताजे दूध यांचे मिश्रण आहे. आले, लिंबू, मीठ अशा कशाचाही वापर न करता काढलेला फक्त उसाचा रस आणि समप्रमाणात दूध घेऊन ते एकत्र मिसळले जाते. ग्राहकांच्या आवडीनुसार बर्फ टाकून हा दुधरस पिण्यास दिला जातो.
नारळ पाणी नाही, तर क्रीम ज्यूस! तुम्ही कधी प्यायला का असं काही? पाहा VIDEO
काय आहेत फायदे ?
दूध रस म्हणजे उसाचा रस आणि दुधाचे मिश्रण. हे दोन्हीन घटक शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहेत. हा दूध रस नियमित पिल्यामुळे शरीरातील थकवा दूर होण्यास मदत तर होते. त्याचबरोबर वजन वाढण्यासाठी देखील मदत होते.
किती आहे किंमत?
महालक्ष्मी रसवंतीगृह या दुकानात सध्या उसाचा रस, बदाम थंडाई आणि हा दूधरस मिळतो. यापैकी ऊसाचा रस हा 20 रुपये, थंडाई 30 रुपये आणि दूधरसही 30 रुपयांना मिळतो. - सकाळी 10 वाजता सुरू होणारे हे रसवंती गृह रात्री 10 पर्यंत आठवड्याचे सातही दिवस सुरु असते. शरिराला गुणकारक रस पिण्यासाठी ग्राहक देखील इथं करतायत.
कुठे घेणार दूधरस?
महालक्ष्मी रसवंती गृह, ताराबाई रोड, साकोली कॉर्नर चौक, शिवाजी पेठ कोल्हापूर - 416012
संपर्क ( विजय राणगे):
+918055006203
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.