मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Video viral : अरं थांबा! कोल्ड्रिक्सचा कंटेनर उलटला, कोल्हापुरकरांनी दिवसाढवळ्या लुटला LIVE VIDEO

Video viral : अरं थांबा! कोल्ड्रिक्सचा कंटेनर उलटला, कोल्हापुरकरांनी दिवसाढवळ्या लुटला LIVE VIDEO

कोल्हापुरात पुईखडी इथं आज सकाळी शीतपेय घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. यावेळी नागरिकांनी ट्रकचालकास मदत करण्याऐवजी शीतपेय पळवून नेली.

कोल्हापुरात पुईखडी इथं आज सकाळी शीतपेय घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. यावेळी नागरिकांनी ट्रकचालकास मदत करण्याऐवजी शीतपेय पळवून नेली.

कोल्हापुरात पुईखडी इथं आज सकाळी शीतपेय घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. यावेळी नागरिकांनी ट्रकचालकास मदत करण्याऐवजी शीतपेय पळवून नेली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 04 फेब्रुवारी : कोल्हापुरात पुईखडी इथं आज सकाळी शीतपेय घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. यावेळी नागरिकांनी ट्रकचालकास मदत करण्याऐवजी शीतपेय पळवून नेली. शितपेयाचा ट्रक पलटी झाल्याची माहिती मिळताच या ठिकाणी झुंबड उडाली. अनेकांनी दुचाकीवरून शितपेयाचे बॉक्स पळवले.

गोव्याकडे जाणारा शीतपेयांचा एक कंटेनर आज पहाटेच्या सुमारास घाटात उलटला. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात असणाऱ्या पिराचीवाडी परिसरात हा अपघात झाला. आज सकाळ-सकाळी शीतपेयांच्या बाटल्या उचलून-नेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

हे ही वाचा : Shocking : बाल्कनीची जाळी तुटली अन् सहाव्या मजल्यावरुन खाली पडला तरुण, CCTV VIDEO व्हायरल

येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांनीही शीतपेयांच्या पडलेल्या बाटल्या उचलून न्यायला गर्दी केली होती. ही बातमी आजूबाजूच्या गावात पसरताच मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतूक देखील विस्कळीत झाली होती, अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.

या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून यामध्ये कोल्डड्रिंक्सचा कंटेनर रस्त्याकडेला पलटी झाल्याचे दिसून येत आहे. तर कोल्डड्रिंक्सच्या बॉटल्स पळवून नेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. आपल्या आवडीच्या कोल्डड्रिंक्सच्या बाटल्या नेण्यासाठी काहींनी तर आपल्या दुचाकीवरून हजेरी लावली आहे. तरूणांसोबतच ज्येष्ठांचीही यासाठी धडपड दिसून येत होती.

हे ही वाचा : आयला! हे कसं केलं? असा जबरदस्त Magic Video पाहून तुम्हीही चक्रावून जाल

काही कोल्डड्रिंक्स प्रेमींनी तर आपल्या दुचाकीवर कोल्डड्रिंक्सचे ट्रे ठेवून तर काहींनी पोती भरून बाटल्या पळवून नेल्या. तर काही पठ्ठ्यांनी आपली ओळख लपवण्यासाठी तोंडाला रूमाल बांधून बॉक्सच्या बॉक्स भरून बाटल्या पळवल्या. लहानांपासून तरूणांपर्यंत इतकेच काय ज्येष्ठ नागरिकांनीही आपल्यालाला उचलता येतील तितक्या उचलून तेथून काढता पाय घेतला.

First published:

Tags: Kolhapur, Video viral