मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नवरात्राच्या तोंडावर अंबाबाईच्या पेड दर्शनावरून वाद, हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध

नवरात्राच्या तोंडावर अंबाबाईच्या पेड दर्शनावरून वाद, हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध

Kolhapur Mahalaxmi Mandir

Kolhapur Mahalaxmi Mandir

अंबाबाई मंदिरात पेड दर्शनावरून वाद निर्माण झालाय. हिंदुत्ववादी संघटनांनी याला विरोध केल्यानंतरही जिल्हाधिकारी या निर्णयावर ठाम आहेत.

  • Published by:  Shreyas
कोल्हापूर, 20 सप्टेंबर : अंबाबाई मंदिरात पेड दर्शनावरून वाद निर्माण झालाय. हिंदुत्ववादी संघटनांनी याला विरोध केल्यानंतरही जिल्हाधिकारी या निर्णयावर ठाम आहेत. देवीच्या दारात गरीब श्रीमंत भेद यामुळे निर्माण होईल त्यामुळे याचा जिल्हाधिकाऱ्यांनी पुनर्विचार करावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. अंबाबाई मंदिरात नवरात्र काळात पेड दर्शनाचा निर्णय घेण्यात आलाय. 200 रुपये आकारून तासाला एक हजार लोकांना दर्शन देण्यात येणार आहे, मात्र देवीच्या दारात दर्शनाचा बाजार व्हायला नको आणि गरीब आणि श्रीमंत भेद नको म्हणून याला विरोध होत आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी याबाबत आंदोलनाचा इशारा दिला होता, मात्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार मात्र या निर्णयावर ठाम असून भाविकांच्या सोयीसाठीच हा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केलाय. या बाबत आज हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेउन त्यांना वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. पेड दर्शनामुळे भाविकांमध्ये गोंधळ उडण्याची भीती त्यांनी व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत फेरविचार करावा, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केलीय. भाविकांनीही देवस्थान समितीच्या या निर्णयाला विरोध केलाय. तास न तास प्रवास करून दर्शन रांगेसाठी आम्ही उभे राहतो, मात्र पेड पास घेऊन काही जण थेट मंदिरात जात आसतील, तर हे चुकीचे असल्याच भाविकांचे म्हणणे आहे.
First published:

Tags: Kolhapur

पुढील बातम्या