मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Kolhapur Accident : गणपती देखावा पहायला जाणाऱ्या कोल्हापूच्या दोन जिवलग मित्रांवर काळाचा घाला

Kolhapur Accident : गणपती देखावा पहायला जाणाऱ्या कोल्हापूच्या दोन जिवलग मित्रांवर काळाचा घाला

कोल्हापूर जिल्ह्यात गगणबावडा रोडवर चिंवचवडे तर्फ कळे येथे भिषण अपघातात दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Kolhapur Accident)

कोल्हापूर जिल्ह्यात गगणबावडा रोडवर चिंवचवडे तर्फ कळे येथे भिषण अपघातात दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Kolhapur Accident)

कोल्हापूर जिल्ह्यात गगणबावडा रोडवर चिंवचवडे तर्फ कळे येथे भिषण अपघातात दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Kolhapur Accident)

  • Published by:  Sandeep Shirguppe

कोल्हापूर, 03 सप्टेंबर : कोल्हापूर जिल्ह्यात गगणबावडा रोडवर चिंवचवडे तर्फ कळे येथे भिषण अपघातात दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Kolhapur Accident) ही घटना रात्रीच्या सुमारास घडली कोल्हापूरला गणपतीचा देखावा पाहण्यासाठी जात असताना ट्रक आणि मोटारसायकलच्या भीषण अपघातात चिंचवडे तर्फ कळे (ता. करवीर) येथील विकास संभाजी तोरस्कर (20) आणि ऋषीकेश राजाराम कांबळे (21) हे दोन तरुण ठार झाले. या घटनेने चिचवडे गावावर ऐन सणासुदीच्या शोककळा पसरली आहे.

कोल्हापूर-गगनबावडा रोडवरील बालिंग्यापासून काही अंतरावरील पाटील पेट्रोल पंपासमोर काल (दि.02) रात्री हा अपघात घडला. ऐन गणेशोत्सवातील घटनेने चिंचवडे तर्फ कळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. घटनास्थळासह शासकीय रुग्णालयात तोबा गर्दी झाली होती. दरम्यान विकास आणि ऋषीकेश हे दोघे जिवलग मित्र होते. ते देखावे पाहण्यासाठी शुक्रवारी रात्री दुचाकीवरून कोल्हापूरकडे येत होते.

हे ही वाचा : मुलाच्या आत्महत्येचं दुःख सहन न झाल्याने आईनेही उचललं भयानक पाऊल, पालघरमधील धक्कादायक घटना

पाटील पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर दोन दुचाकी एकमेकांना घासल्याने त्यांचा वाहनावरील ताबा सुटला. दोघेही पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकवर (एमएच 14 जीयू 8881 ) जोरात आदळले. त्यात एकजण ट्रकच्या मागील चाकात चिरडला गेला; तर दुसरा ट्रकला धडकून जोरात फेकला गेला. यामध्ये ऋषीकेश जागीच ठार झाला; तर विकासचा शासकीय रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

हे ही वाचा : एका प्रेमाची भयानक गोष्ट! पत्नीनं सोडलं मावस बहिणीशी जवळीक वाढली पण नातं आड आलं...अन् प्रेमाचा भयावह THE END

अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवानांनी अग्निशमन दलाच्या वाहनातून दोघांना तातडीने रुग्णालयात हलविले. विकास तोरस्कर आणि ऋषीकेश कांबळे हे कॉलेज विद्यार्थी होते. विकास कोल्हापुरात खासगी कंपनीत नोकरी करून शिक्षण घेत होता. करवीरचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, सहाय्यक निरीक्षक सुरज बनसोडे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.

First published:

Tags: Accident, Bike accident, Kolhapur, Major accident

पुढील बातम्या