मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मूल होत नव्हतं म्हणून मित्राच्या 7 वर्षीय मुलाचं अपहरण करून केला खून, कोल्हापूर हादरलं

मूल होत नव्हतं म्हणून मित्राच्या 7 वर्षीय मुलाचं अपहरण करून केला खून, कोल्हापूर हादरलं

कागल तालुक्यातील एका कुटुंबाला मूल होत नाही म्हणून त्यांनी मित्राच्या मुलाचं अपहरण करून त्याचा बळी दिल्याची संतापजनक घटना सोनाळी गावात घडली

कागल तालुक्यातील एका कुटुंबाला मूल होत नाही म्हणून त्यांनी मित्राच्या मुलाचं अपहरण करून त्याचा बळी दिल्याची संतापजनक घटना सोनाळी गावात घडली

कागल तालुक्यातील एका कुटुंबाला मूल होत नाही म्हणून त्यांनी मित्राच्या मुलाचं अपहरण करून त्याचा बळी दिल्याची संतापजनक घटना सोनाळी गावात घडली

कोल्हापूर, 21 ऑगस्ट : वंशाचा दिवा मिळावा म्हणून अनेक महाभाग पोटात कवळ्या जीवाची हत्या करत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. पण, कोल्हापूरमध्ये (kolhapur) आपल्याला मुलगा होत नाही म्हणून मित्राच्या 7 वर्षीय मुलाचं अपहरण करून हत्या करण्याची संतापजनक घटना समोर आली आहे. हा एक नरबळीचा प्रकार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल (kagal) तालुक्यातील एका कुटुंबाला मूल होत नाही म्हणून त्यांनी मित्राच्या मुलाचं अपहरण करून त्याचा बळी दिल्याची संतापजनक घटना सोनाळी गावात घडली आहे. वरद रवींद्र पाटील (varad pravindra patil) असं बळी देण्यात आलेल्या 7 वर्षाच्या बालकाचं नाव आहे.

पावसाळ्यात वाढला माशांचा त्रास? अशा घरगुती स्प्रेने एकही माशी घरात येणार नाही

सावर्डे बुद्रुक येथून दोन दिवसांपूर्वी त्याच अपहरण झाल होतं. याबाबतची तक्रार त्याचे वडील रवींद्र पाटील यांनी मुरगूड पोलिसात दिली होती. परंतु, पोलिसांना वरदचा शोध घेण्यात अपयश आलं होतं. पण शुक्रवारी त्याचा मृतदेह सोनाळी येथील डोंगरात मिळून आल्यान पंचक्रोशीतील नागरिक आणि महिलांतून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. त्यांनी पोलिसांना घेराव घालून याबाबत जाब विचारला.

वरद हा आजोळ सावर्डे बुद्रुक इथं आजोबा दत्तात्रय म्हातुगडे यांच्या घरांच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी आई-वडिलांसोबत गेला होता. मंगळवार रात्री साडे आठच्या तो बेपत्ता झाला होता. रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी त्याचा शोध घेवूनही तो सापडला नाही.

विद्युत दाहिनीत मृतदेहाचं नेमकं काय होतं? डॉक्टरचा मोठा खुलासा

भरवस्तीत असणाऱ्या गल्लीतून वरद गायब कसा झाला याबाबत तर्कवितर्क वर्तवले जात होते. या गल्लीत नेहमी नागरिकांची वर्दळ असते, अशा ठिकाणाहून तो गायब झाल्याने त्याचवेळी हे कृत्य कुण्या माहितीतील व्यक्तीचे असण्याची शक्यता व्यक्त झाली आहे.

आरोपीने दिली खुनाची कबुली

या प्रकरणी मुलाचे वडील रवींद्र पाटील यांनी मुरगूड पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी तपास करून एका संशयिताला ताब्यात घेतलं होतं. मारुती वैद्य (वय 45) असं आरोपीचं नाव आहे. मारुती वैद्य यानेच वरदचं अपहरण केलं होतं. त्यानंतर शेतात गळा आवळून त्याचा खून केला होता. त्यानंतर वरदचा मृतदेह हा सावर्डे गावाच्या तलावाजवळ फेकून दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून नेमका हा प्रकार नरबळीतून आहे की इतरही कारण आहे, याचा पोलीस तपास करत आहे.

First published: