कोल्हापूर, 15 जानेवारी : 1952 साली भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांची आज (दि.15) जयंती आहे. दरम्यान त्यांच्या कर्तुत्वाची दखल गुगलने घेतल्याने देशभरात खाशाबा जाधव यांचे महत्व अधोरेखीत होते. खाशाबा जाधव यांना पद्म किंवा पद्मविभुषण मिळावा यासाठी संसदेत पाठपुरावा करण्याता आला परंतु अद्यापही सरकारकडून कोणतीही दखल घेतली नाही. यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आवाज उठवला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला सवाल केला आहे.
संभाजीराजे म्हणाले की, 1952 साली भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांची आज जयंती. त्यांच्या जयंती निमित्त गुगलने खास डूडल तयार करून त्यांना अभिवादन केले आहे. मात्र त्यांच्या कार्याला उचित सन्मान देऊन अभिवादन करण्यासाठी सरकार केव्हा जागे होणार, हाच प्रश्न आहे !
हे ही वाचा : बीडमध्ये फडणवीसांच्या कार्यक्रमाला मुंडे भगिणी पुन्हा गैरहजर, राजकीय चर्चांना उधाण
देशासाठी ऑलिम्पिक पदक मिळविणाऱ्या खेळाडूस सरकारकडून "पद्म" पुरस्काराने सन्मानित केले जाते. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. मात्र ज्यांनी देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले ते पैलवान खाशाबा जाधव अजूनही पद्म पुरस्कारापासून वंचित आहेत. मी खासदार असताना 2017 ते 2022 अशी सहा वर्षे सलग, खाशाबांना मरणोत्तर "पद्मविभूषण" मिळावा, यासाठी केंद्रात सर्व पातळीवर वारंवार पाठपुरावा केला, मात्र शेवटी उपेक्षाच झाली.
आता तरी सरकारने जागे व्हावे. या महान मल्लावर ऑलिम्पिकच्या मैदानातही अन्याय झाला होता, तरीदेखील देशासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिद्दीने जिंकून आणणाऱ्या खाशाबा जाधव यांना "पद्म" पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा उचित गौरव करणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल.
हे ही वाचा : 'उगाच पलटन वाढवू नका, देवाची कृपा नसते आम्हाला माहितीये' अजितदादांच्या सल्ला आणि एकच हश्शा
खाशाबा जाधव यांनी भारतरत्न द्या… राजू शेट्टींचीही मागणी
माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यांच्या खासदारीकीच्या काळात संसदेत खाशाबा जाधव यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावा यासाठी तत्तकालीन गृहमंत्री पी. चिदंबरम, सुशिल कुमार शिंदे, राजनाथ सिंह या तीन गृहमंत्र्यांच्याकडे पाठपुरावा केला होता परंतु त्यांच्याही पदरी निराशाच आल्याचे दिसून आले. याचबरोबर शेट्टी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून विनंती केली होती. पंरतु केंद्र आणि राज्य सरकारने याकडे वारंवार कानाडोळा केल्याची खंत शेट्टी यांनी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.