मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ईडीच्या कारवाईनंतर KDCCच्या कर्मचाऱ्याला हार्ट अटॅक

ईडीच्या कारवाईनंतर KDCCच्या कर्मचाऱ्याला हार्ट अटॅक

KDCC kolhapur

KDCC kolhapur

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

कोल्हापूर, 03 फेब्रुवारी : सक्तवसुली संचालनालयाने बुधवारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, जिल्हा बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक सुनील लाड यांना हृदयविकाराचा धक्का बसला आहे. ईडीच्या कारवाईनंतर त्यांना हार्ट अटॅक आला. ईडीच्या पथकाने सलग तीस तास चौकशीसाठी ज्या अधिकाऱ्यांना थांबवले होते त्यात सुनील लाड यांचा समावेश होता. आता या प्रकारानंतर बँकेचे कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले आहेत.

ईडीकडून गुरुवारीसुद्धा चौकशी सुरू असताना लाड हे बँकेत होते. ईडीच्या चौकशीमुळे बँकेचे कर्मचारी आणि अधिकारी तणावाखाली आहेत. त्यामुळे जर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या प्रकृतीला काही झाले तर त्याला ईडी जबाबदार असेल असा इशारा कर्मचारी संघटनेकडून देण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांना गुरुवारी सकाळपासून विभाग सोडायचे नाहीत असे आदेश देण्यात आले होते. त्यानतंर कर्मचाऱ्यांना बँकेतून खाली पाठवून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पाच जणांना ताब्यात घेतल्यानंतर कर्मचारी आक्रमक झाले होते.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी केडीसीसीच्या मुख्य कार्यालयासह जिल्ह्यातील सर्वा शाखेत सकाळी एक तास आंदोलन केले गेले. बँकेतील दोन्ही युनियनने द्वारसभाही घेतली. ईडीचे चार अधिकारी येऊन प्रश्न विचारून गेले म्हणजे बँकेवर काही परिणाम होईल असा भ्रम असेल तर तो चुकीचा आहे. जाणीवपूर्वक सहकारी संस्थांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास कर्मचारी चोख उत्तर देतील असा इशारा अतुल दिघे यांनी दिला.

First published:

Tags: Kolhapur