कोल्हापूर, 07 जुलै : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात पूराचे पाणी वाढत आहे. मागच्या तीन दिवसांच्या पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नागरिक पाणी पाहण्यासाठी पंचगंगा नदीच्या पुलावर येत आहेत. (Kolhapur rain update) दरम्यान काही तरूण हुल्लडबाजी करत असल्याचे समोर आले आहे. (panchaganaga river swimmer) पुराच्या पाण्यात उड्या घेत पोहण्याचे अतिधाडस करतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. दरम्यान पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांनी भावना व्यक्त केल्या. दरम्यान पुराच्या पाण्याची वाढ होत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील 26 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. (Kolhapur rain update panchaganga flood)
कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदी काठावर काही तरूण पोहत असल्याने प्रशासनासाठी तसेच पालकांसाठी चिंतेची बाब बनली आहे. पंचगंगेच्या पुराच्या पाण्यात अनेक तरुणांसह मुलांनी पुलावरून उड्या मारत पोहण्याचा आनंद लुटत आहेत. त्यांचे हे साहस पाहण्यासाठी नागरिकांची गर्दीही होती. दरम्यान, पुलावरून तरुण पुराच्या पाण्यात उड्या मारत असताना, प्रशासकीय यंत्रणेकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
गंमत म्हणून 30 फूट उंच पुलावरून पुराच्या पाण्यात उड्या मारणाऱ्या या कोल्हापूरकरांना काय म्हणाल? पंचगंगा नदी काठावर काही तरुण फुगलेल्या नदीपात्रात पोहत असल्याने प्रशासनासाठी तसेच पालकांसाठी चिंतेची बाब बनली आहे. #Kolhapurrain #RainUpdate #MaharashtraRain #Alert pic.twitter.com/m36t8jtYQV
— News18Lokmat (@News18lokmat) July 7, 2022
हे ही वाचा : कोकण, मध्य महाराष्ट्रासह, विदर्भातही पावसाचा हाहाकार, ढगफुटीमुळे तालुकाच पाण्याखाली
पुराच्या पाण्यात जाण्यापासून कोणतीही यंत्रणा याठिकाणी उपलब्ध नसल्याचे बोलले जात आहे. आपत्ती निवारन केंद्राकडून त्यांच्या चौकटीतील कार्य सुरू असले तरी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून अशा उड्या रोखणे गरजेचे आहे. पुलाजवळ पुराच्या पाण्याचा वेग अधिक आहे. त्यामुळे याठिकाणी उडी मारणे ही जिवाशी खेळण्यासारखे असते. पुराच्या पाण्यात पोहताना वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. नदीकाठावर प्रशासकीय यंत्रणेमार्फत नियंत्रण नसल्याने, या घटनांमधून बळी जाण्याचाही धोका संभवत आहे.
कोल्हापूर - जिल्ह्यात सद्यस्थिती मध्ये पूर परिस्थिती नाही मात्र पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी 32 फुटांपर्यंत पोहचली ( इशारा पातळी 39 तर धोका पातळी 43 फुट). जिल्ह्यातील 26 बंधारे पाण्याखालील गेले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून कक्षाने दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, NDRF च्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच नदी काठावरील लोकांना सातत्याने सतर्कतेच्या सूचना देण्यात येत आहेत. स्थानिक शोध व बचाव पथकेही तैनात करण्यात आली आहे.
हे ही वाचा : 'तुफानी करते है' अजगर पोहोचला 70 फूट उंच विजेच्या टॉवरवर, 7 तासांच्या थरारक रेस्क्युचा VIDEO
राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 15 तुकड्या तैनात
मुंबई ( कांजूरमार्ग 1 घाटकोपर 1) -2, पालघर - 1, रायगड - महाड- 2, ठाणे - 2,रत्नागिरी-चिपळूण -2, कोल्हापूर-2, सातारा-1, सिंधुदुर्ग-1 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण 13 टीम तैनात आहेत.तर नांदेड-1,गडचिरोली-1 अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.
राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कायमस्वरूपी 9 तुकड्या
मुंबई -3, पुणे-1, नागपूर-1 अशा एकूण 5 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे- 2, नागपूर-2 अशा एकूण 4 टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या कायमस्वरूपी तुकड्या तैनात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, Rain fall, Rain flood, Rain in kolhapur