कोल्हापूर, 9 डिसेंबर : सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. तर बऱ्याच ठिकाणी काही खरेदी केल्यावर ऑनलाईनच्या स्वरुपात पैसे देण्याची सोय उपलब्ध असते. अशाच ऑनलाईनच्या व्यवहारासंदर्भात कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंबाबाई मंदिर परिसरातील चप्पल स्टँड चालकाने पोलीस ठाण्यात धिंगाणा केला.
काय आहे नेमकं प्रकरण -
या चालकाने कपडे काढत अर्धनग्न होण्याचा प्रकार समोर आला आहे. तर धिंगाणा केल्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यासंदर्भात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. राजवाडा पोलिसांनी चप्पल स्टँड चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. धिंगाण्याचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्याकडून जारी करण्यात आले आहेत.
ग्राहकाकडून चुकून चप्पल ठेवणाऱ्या व्यक्तीकडे ऑनलाईन साडेआठ हजार रुपये गेले. ते परत मागण्यासाठी गेले असता पैसे देण्याऐवजी चप्पल स्टँड धारकाने वाद घातला. या चालकाने कपडे काढत अर्धनग्न होण्याचा प्रकार समोर आला आहे. तर धिंगाणा केल्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरातील चप्पल स्टँड चालकाचा पोलीस ठाण्यात धिंगाणा, ग्राहकाकडून चुकून आलेले पैसे परत देण्याऐवजी काढले कपडे#Kolhapur pic.twitter.com/3kdPQVaL2Y
— News18Lokmat (@News18lokmat) December 9, 2022
हेही वाचा - एकाच रात्री दोनदा शरीरसंबंध ठेवण्यास पत्नीचा नकार, पतीने उचललं टोकाचं पाऊल
9 लाखांची चोरी, दीड लाख फक्त खाण्यावर उडवले, बॉयफ्रेंडसाठी तरुणीने पाहा काय केलं?
नालासोपारा एव्हरशाईन सिटी येथे प्रियकरासोबत मजेत ऐशोआरामात जीवन जगण्यासाठी एका युवतीने धक्कादायक पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. या तरुणीने आईच्या मैत्रिणीच्या घरी चोरी करून लाखो रुपये चोरी केली.
रश्मिगार्डन, एव्हरशाईन सिटी येथे राहणाऱ्या दिव्या सुरेश पटेल यांच्या घरी राहत्या घरात कोणीतरी अज्ञात चोरट्याने प्रवेश केला होता आणि त्यांच्या घरातील एका लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि 8 लाख 36 हजार रुपये रोख रक्कम मिळून अशी एकूण 9 लाख 36 हजार रुपयांची चोरी केला होता.
हर्षिता आणि तिच्या प्रियकराने ऐशोआराम खाण्या-पिण्यावर तब्बल दीड लाख खर्च केले होते. तर उरलेल्या पैशात फ्रीज, आयफोन, केटीएम बाईक, फर्निचर, वस्तू विकत घेतल्या होत्या. आचोळे पोलिसांनी चोरी केलेले 4 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चोरीच्या रक्कमेतून खरेदी केलेला आयफोन, केटीएम मोटर सायकल, फर्निचर, फ्रिज अशा महागड्या वस्तु तसेच 4 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम असा एकुण 7 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cctv footage, Crime news, Kolhapur, Police