मुंबई, 21 मे : महापूर पट्ट्यातील पिकांचे (flood affected crop) दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. नुकसानभरपाईसाठी सरकारने तातडीने महापूरबाधित होणाऱ्या पिकांचा पीक विम्यामध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (raju shetti) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत गेल्या काही वर्षांत पाच मोठे महापूर येऊन शेतकऱ्यांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सन २०१९ व २०२१ च्या महापुरात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या महापुरात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली.
गतवर्षी नुकसान होऊनही राज्य सरकारने अतिशय तोकडी मदत देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. ऊस, भात, सोयाबीन, केळी, तसेच भाजीपाला ही पिके प्रामुख्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील बागायती पट्ट्यामध्ये घेतली जातात. वेळोवेळी आलेल्या महापुराच्या तडाख्याने ही पिके पूर्णपणे उद्ध्वस्त होतात. या पिकांचा पीक विम्यामध्ये समावेश करावा.
हे ही वाचा : चिमण्यांचा किलबिलाट; 15 वर्षांपासून 'या' ठिकाणी घरातच भरते चिमण्यांची शाळा...
तसेच उसाला एकरी १ लाख, सोयाबीन ५० हजार, केळी २ लाख आदी पिके तसेच भाजीपाला आदींची पीक विम्यामध्ये नुकसानभरपाईची तरतूद करावी. विम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकरी भरण्यास तयार आहेत. या पीक विम्यामुळे सरकारला नुकसान भरपाई देताना कोणताही बोजा पडणार नाही. तसेच शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.
महापुरामुळे वेळोवेळी नुकसान भरपाई होणे आता शेतकऱ्यांना अजिबात परवडणारे नाही. महापूरग्रस्त शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून महापूर पट्ट्यातील सर्व पिकांचा पीक विम्यामध्ये समाविष्ट करावा, अशी मागणीही शेट्टी यांनी केली आहे.
देशव्यापी लढा उभारण्यासाठी हुंकार यात्रा
केंद्र सरकारने तातडीने हमीभावाचा कायदा करावा यासाठी देशातील शेतकरी संघटनांनी राजू शेट्टी व व्ही. एम. सिंग (raju shetti and v m singh) यांच्या नेतृत्वाखाली एमएसपी गॅरंटी किसान मोर्चाची स्थापना केली आहे. महाराष्ट्रात १५ एप्रिल पासून बळीराजा हुंकार यात्रा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर ईशान्यकडील राज्यांमध्ये लक्ष केंद्रीत केले आहे.
स्थिर बाजाराचा अभाव, यांत्रिकीकरणाचा अभाव, कृषी पायाभूत सुविधा, शिक्षणाच्या अभावामुळे ईशान्य भारतातील शेतकरी आणि जमिनदार यांच्यात दरी निर्माण झाली आहे. आसाममधील शेतकरी मागासलेला आहे. त्याची उपजिविका ही शेतीवरच अवलंबली आहे. इतर राज्याच्या मानाने आधुनिक उपकरणांचा वापर नगण्य आहे. किमान हमीभावासाठी येथील शेतकरी संघर्ष करण्याच्या तयारीत आहेत. या आठ राज्यातील शेतकरी नेते व शेतकरी एकत्र येऊन येथील शेती प्रश्नासंदर्भात लढा उभा केले जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Raju Shetti, Raju Shetti (Politician), पीक, पीक कर्ज, शेतकरी, स्वाभिमानी शेतकरी संघटना