Home /News /maharashtra /

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचा धोका टळणार पाणी पातळीत घट, पाऊस थांबला

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचा धोका टळणार पाणी पातळीत घट, पाऊस थांबला

(Kolhapur) तीन दिवसांच्या संततधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात पूर (Kolhapur district flood situation) स्थिती निर्माण झाली आहे.

  कोल्हापूर, 07 जुलै : मागच्या तीन दिवसांपासून कोल्हापूर (Kolhapur rain update) जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. (Kolhapur) तीन दिवसांच्या संततधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात पूर (Kolhapur district flood situation) स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान आज सकाळपासून पावसाने थोडी उसंत घेतल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. झालेल्या पावसाने शेतीच्या कामांना चांगलाच वेग आहे. घाटमाथ्यावरील शेतकरी भाताच्या पेरणीसाठी लगबगीला लागले आहेत. दरम्यान 26 बंधारे (Kolhapur type bandhara) पाण्याखाली आहेत तर पंचगंगेची पाणी पातळी (panchaganga water level) 32.6 इंचांवर येऊन थांबली आहे. पुढचे काही दिवस पाऊस लागला असता तर जिल्ह्याचा पुराचा विळखा आणखी घट्ट झाला असता.

  कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात 92.28 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व बाजारभोगाव, कुंभी नदीवरील- शेणवडे व कळे, वेधगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण व वाघापूर. धामणी नदीवरील- सुळे व अंबार्डे,  दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, तुळशी नदीवरील- बीड व वारणा नदीवरील- चिंचोली असे 27 बंधारे पाण्याखाली आहेत.

  हे ही वाचा : पुराच्या पाण्यात पोहण्यासाठी उड्या! कोल्हापूरकरांचा नादखुळा वगैरे ठीक, पण या अतिरेकी धाडसाला काय म्हणाल?

  आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 43.74 दलघमी, वारणा 384.44 दलघमी, दूधगंगा 238.68 दलघमी, कासारी 37 दलघमी, कडवी 28.05 दलघमी, कुंभी 36.56 दलघमी, पाटगाव 45.04 दलघमी, चिकोत्रा 20.25 दलघमी, चित्री 19.49 दलघमी, जंगमहट्टी 15.10 दलघमी, घटप्रभा  44.17 दलघमी, जांबरे 12.51 दलघमी, आंबेआहोळ 19.95, कोदे -(6.06) लघु प्रकल्प काल दि. 6 जुलै रोजी दुपारी 2.15 वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे.

  तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 32.06 फूट, सुर्वे 31 फूट, रुई 60.9 फूट, इचलकरंजी 57 फूट,  तेरवाड 49.5 फूट, शिरोळ 37.6 फूट, नृसिंहवाडी 32 फूट, राजापूर 23.11 फूट तर नजीकच्या सांगली 7.6 फूट व अंकली 11.6  फूट अशी आहे. मागच्या 24 तासांत दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 80.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

  हे ही वाचा : 60 पेक्षा जास्त गावांचा थेट संपर्क तुटला, नागरिकांच्या स्थलांतराची तयारी

  कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी 11 पर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे- हातकणंगले- 7 मिमी, शिरोळ -4.1 मिमी, पन्हाळा- 28.8 मिमी, शाहूवाडी- 24.6  मिमी, राधानगरी- 35.1 मिमी, गगनबावडा-80.6 मिमी, करवीर- 15.2 मिमी, कागल- 18 मिमी, गडहिंग्लज- 19.1 मिमी, भुदरगड- 44.3 मिमी, आजरा-42.5  मिमी, चंदगड- 32.3  मिमी  पाऊस पडल्याची नोंद आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Kolhapur, Rain fall, Rain flood, Rain in kolhapur

  पुढील बातम्या