मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महसूल खाते न मिळाल्यामुळे नाराज आहात का? चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट शब्दांतच सांगितलं...

महसूल खाते न मिळाल्यामुळे नाराज आहात का? चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट शब्दांतच सांगितलं...

कोणताही खातं छोटे नसतं. एक नंबर दोन नंबर नसतं. संघटना काम पाहत असते त्यानुसार जबाबदारी मिळत जाते',

कोणताही खातं छोटे नसतं. एक नंबर दोन नंबर नसतं. संघटना काम पाहत असते त्यानुसार जबाबदारी मिळत जाते',

कोणताही खातं छोटे नसतं. एक नंबर दोन नंबर नसतं. संघटना काम पाहत असते त्यानुसार जबाबदारी मिळत जाते',

    कोल्हापूर, 15 ऑगस्ट : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून खातेवाटपही जाहीर झाले आहे. शिंदे गटामध्ये नाराजी असताना भाजपमध्येही मोठे बदल झाले आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे असलेले महसूल खाते हे राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आले आहे. आता नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस हे समर्थ आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुढे बोलण्याचं टाळलं. कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी माध्यमांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी खातेवाटपावर प्रतिक्रिया दिली. 'आमच्या सरकारमध्ये कुणीही खातेवाटपावर नाराज नाही. नाराजी संपवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस समर्थ आहे कोणीही काळजी करू नये, मला अतिशय उत्तम खात मिळालं आहे. कोणताही खातं छोटे नसतं. एक नंबर दोन नंबर नसतं. संघटना काम पाहत असते त्यानुसार जबाबदारी मिळत जाते',  अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. 'सामना हे दैनिक शिवसेनेचं मुखपत्र आहे. उद्धव ठाकरे हे आता विरोधी गटात आहे, त्यामुळे त्यांना टीका करण्याचा अधिकार आहे.  2014 ते 2019 युतीच्या काळातही सामना टीका करत होता आता तर विरोधक झालाय विरोधकांनी टीका करायची असते. चांगल्याला चांगलं म्हणायचं असतं पण तसे काही होत नाही, असा पलटवार पाटील यांनी केला. (मुंबईकरांना स्वातंत्र्य दिनाची भेट, मध्य रेल्वेवर धावणार आणखी 10 एसी लोकल!) 'देशाचे नवीन शैक्षणिक धोरण मोदींनी आणलंय. त्याच्या अंमलबजावणीत करण्यासाठी शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण महत्त्वाचा आहे. देशाला चांगले इंजिनियर आहे तयार करावे लागतील. उद्या दुपारी एक वाजता आता  माझ्या विभागाची सेक्रेटरी यांची बैठक होईल. आधीच्या सरकारने काय चुकीचं  केल बर  केलंय हे पाहणारा आहे. मी बऱ्याला बरं म्हणणारा माणूस आहे', असंही पाटील म्हणाले. ('कुवत नसलेली लोकं सत्तेत बसत असतील तर..'; मोदींच्या टीकेवर अजित पवारांचं उत्तर) 'विनायक मेटे यांच्या अपघातातील ट्रक सुरतला सापडला अशी माहिती आहे. घातपात असेल तर त्याच्या मुळापर्यंत मुख्यमंत्री जातील', अशी माहिती पाटील यांनी दिली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या