मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Bamboo : अभिनय बेर्डेला कसा मिळाला नवा लूक? पाहा Inside Story, Video

Bamboo : अभिनय बेर्डेला कसा मिळाला नवा लूक? पाहा Inside Story, Video

X
Bamboo

Bamboo : अभिनय बेर्डेच्या या चित्रपटातील कुरळ्या केसांच्या नव्या लुकची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचा हा लूक कसा ठरला हे माहिती आहे का?

Bamboo : अभिनय बेर्डेच्या या चित्रपटातील कुरळ्या केसांच्या नव्या लुकची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचा हा लूक कसा ठरला हे माहिती आहे का?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 22 जानेवारी : प्रत्येकजण त्याच्या आयुष्यात एकदा तरी प्रेमात पडलेला असतो. त्याचवेळी एखाद्याला प्रेमात बांबू कसे लागतात, ते लागल्यानंतर काय करायला पाहिजे, या सर्व गोष्टी अगदी विनोदी पद्धतीने मांडणारा बांबू हा चित्रपट लवकरच सर्वांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री तेजस्विनी पंडित तगड्या स्टार कास्टसह निर्मिती क्षेत्रात आपले पाऊल टाकत आहे.

बांबू या आगामी मराठी चित्रपटाबाबत माहिती देण्यासाठी चित्रपटाची टीम कोल्हापुरात आली होती. क्रिएटिव्ह वाईब प्रस्तुत हा चित्रपट असून तेजस्विनी पंडित, संतोष खेर यांनी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. विशाल देवरुखकर यांनी दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे तर अंबर विनोद हडप यांनी लिहिलेल्या या चित्रपटात अभिनय बेर्डे, शिवाजी साटम, अतुल काळे, पार्थ भालेराव, वैष्णवी कल्याणकर, समीर चौघुले, स्नेहल शिदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

'तरुणाईला हा चित्रपट त्यांच्या आयुष्याच्या जवळपासचा वाटणारा आहे. तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेवून जरी या चित्रपटाची निर्मिती केली असली तरी तरुणांनी हा चित्रपट त्यांच्या पालकांसोबत पाहण्यासारखा आहे. 26 जानेवारीला 'बांबू' प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा एक धमाल एंटरटेनर आहे,' असे यावेळी दिग्दर्शक विशाल देवरूखकर यांनी सांगितले.

Video: तात्या विंचू, कुबड्या खविस... मराठी व्हिलनला खायला 'इथं' होते गर्दी

'या टीमसोबत काम करताना खूप धमाल आली. चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार आहेत. प्रत्येकानेच आपली भूमिका चोख बजावली आहे. चित्रपटाची मांडणी अतिशय उत्तम आहे. मला खात्री आहे, प्रेक्षकांना 'बांबू' नक्कीच आवडेल,' असे मत तर निर्माती तेजस्विनी पंडितने व्यक्त केली. दरम्यान, ती देखील या चित्रपटात एक भूमिका साकारत आहे. पण त्याबद्दल चित्रपट बघताना कळेल असेही तेजस्विनी म्हणाली.

कसा मिळाला अभिनयला नवा लूक ?

अभिनय बेर्डेच्या या चित्रपटातील कुरळ्या केसांच्या नव्या लुकची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्याने याबाबत न्यूज 18 लोकमतशी बोलताना माहिती दिली. 'चित्रपटात माझ्या अभिनया बरोबरच माझ्या लूक मध्येपण काहीतरी वेगळं असण्याची अपेक्षा होती. त्यामुळे वेशभूषाकार महेश बराटे, ज्यांनी अनेक मोठमोठ्या चित्रपटातील लूक डिझाईन केलेले आहेत, त्यांनीच मला हा नवा लूक दिला.

'खरंतर माझ्यासाठी नवीन लूक काही सापडत नव्हता. पण एके दिवशी ते कुरळ्या केसांचा हा लूक घरी घेऊन आले आणि माझी ट्रायल घेतली. मला स्वतःला अशा कुरळ्या केसात बघण्याचा कधी मी विचार देखील केला नव्हता. परंतु जेव्हा तो विग घालून मी पाहिलं, तेव्हा मला वाटलं की हे नवीन काहीतरी आहे. शूटींग वेळी तो लूक करायला एक तास लागत होता. पण आता त्या कष्टांच फळ चांगल मिळत आहे. कारण अनेक ठिकाणी त्या लूकची चर्चा आहे आणि अनेकांना तो लूक आवडतोय,' असे मत अभिनयने व्यक्त केले आहे.

First published:

Tags: Kolhapur, Local18, Marathi cinema, Marathi entertainment