कोल्हापूर, 14 जानेवारी : नाशिकमध्ये जिंदाल कंपनीला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये एका केमिकल कंपनीमध्ये भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरमधील गोकुळ शिरगाव इथं एका कंपनीला भीषण आग लागली आहे. Ceraflux India प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असं या कंपनीचे नाव आहे. आज दुपारी अचानक या कंपनीत आगीचा भडका उडाला. बघता बघता कंपनी भक्षस्थानी सापडली आहे. आगी लोळ दूरपर्यंत दिसून येत आहे.
कोल्हापूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग pic.twitter.com/SCla68fMdS
— News18Lokmat (@News18lokmat) January 14, 2023
केमिकल कंपनी असल्याने नागरिकांना परिसरातून सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. शेजारीच एक पेट्रोलियम कंपनी असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
(कृष्णा नदीपात्रात मृत माशांचा खच, सांगलीकरांचं आरोग्य धोक्यात, पाहा Video)
नाशिकमध्ये जिंदाल कंपनीच्या आगीत 2 जणांचा मृत्यू
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमध्ये जिंदाल कंपनीला भीषण आग लागली होती. तब्बल 24 तासांनंतर ही आग आटोक्यात आली. या आगीत दोघांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले होते. मृत्यू झालेल्या दोन्ही कामगार या महिला आहेत. महिमा (वय 20) आणि अंजली (वय 27) असं मृत्यू झालेल्या महिलांची नाव आहे. नाशिकच्या आयसीयू ऍण्ड क्रोम सेंटरमध्ये या दोन्ही महिलांना दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
(महाबळेश्वरमध्ये भीषण अपघात; मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो दरीत कोसळला)
दरम्यान, राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी इगतपुरीच्या जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली. कामगारांना सर्व मदत करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur