मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ईडीने का छापा टाकला? हसन मुश्रीफांनी पुराव्यासह दिलं उत्तर, सोमय्यांचं टेन्शन वाढवलं

ईडीने का छापा टाकला? हसन मुश्रीफांनी पुराव्यासह दिलं उत्तर, सोमय्यांचं टेन्शन वाढवलं

मुश्रीफ यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. किरीट सोमय्या हे बिनबुडाचे आरोप करत असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी भाजपला देखील टोला लगावला आहे.

मुश्रीफ यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. किरीट सोमय्या हे बिनबुडाचे आरोप करत असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी भाजपला देखील टोला लगावला आहे.

मुश्रीफ यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. किरीट सोमय्या हे बिनबुडाचे आरोप करत असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी भाजपला देखील टोला लगावला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 11 जानेवारी :  राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज सकाळी सहा वाजेपासून ईडीची छापेमारी सुरू आहे. साखर कारखाना प्रकरणात ईडीने मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील घरावर छापेमारी केली. त्याचबरोबत इडीकडून  पुण्यात ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या चंद्रकांत गायकवाड यांच्या घरावर देखील छापेमारी करण्यात आली आहे. चंद्रकांत गायकवाड हे हसन मुश्रीफ यांचे व्यवसायिक भागिदार असल्याचं बोललं जात आहे. मात्र चंद्रकांत गायकवाड हे माझे भागीदार नाहीत, तसेच माझ्या जावयाचा देखील या कंपनीशी काहीही संबंध नाही असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. ईडीच्या छाप्यानंतर मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नेमकं काय म्हटलं मुश्रीफ यांनी? 

मुश्रीफ यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. किरीट सोमय्या हे बिनबुडाचे आरोप करत असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं. ईडीने ज्या ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वर छापे टाकले त्या कंपनीशी माझा किंवा माझ्या जावायाचा काहीही संबंध नाही. चंद्रकांत गायकवाड हे माझे भागीदार नाहीत. साखर कारखाना कंपनी चालवत नाही. साखर कारखान्यात शेतकऱ्यांचा पैसा असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : मुश्रीफ यांच्यानंतर आता राष्ट्रवादीच्या 'या' बड्या नेत्याचा नंबर; सोमय्यांनी नावच सांगितलं

भाजपावर निशाणा 

दरम्यान यावेळी मुश्रीफ यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. कशाबद्दल ईडी छापे घालत आहे, ते माहिती नाही. कशामुळे हे सर्व चालू आहे हे माहिती नाही. अद्याप याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा झालेली नाही. भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. आम्ही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार. यामध्ये अधिकाऱ्यांची काहीच चूक नाही, त्यांना वरून आदेश आले आहेत. कार्यकर्त्यांनी कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये, अधिकाऱ्यांना सहकार्य करावं असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, ED, Kirit Somaiya, NCP